वणी : परशुराम पोटे

 

साईकृपा माध्यमिक विद्यालय मुर्धोणी येथील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यांचा सत्कार साईकृपा विद्यालयात दि. २४/०६/२०२२ ला संस्थेचे सचिव श्री. सुनिलभाऊ कातकडे यांच्या हस्ते करण्यात आला. मार्च २०२२ मध्ये विद्यालयातील २४ विद्यार्थी परिक्षेला बसले होते त्यापैकी ११ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत १२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून देवरावजी कापसे तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनिलभाऊ कातकडे, सौ. रुपालीताई कातकडे, श्रीकृष्णजी घोटे, मुख्याध्यापक अनंतकुमार आंबेकर सर उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे संचालन करमरकर सरांनी ,प्रास्ताविक आंबेकर सरांनी तर आभार प्रदर्शन बोबडे मॅडम यांनी केले.

कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाहूले, खिरटकर सर, पारखी सर, घुगूल, चवले तसचे श्री आत्राम यांनी सहकार्य केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com