उमेश कांबळे
तालुका प्रतिनिधी भद्रावती
शहरातील किल्लावार्ड कुणबी सोसाइटी येथे होत असलेल्या नागरीकांच्या विद्युत समस्येच्या अनेक तक्रारीबाबत भद्रावती विद्युत मंडळ सहाय्यक आभियंत्याला नुकतेच निवेदन देण्यात आले.
भद्रावती शहरातील किल्लावार्ड कुणबी सोसायटी येथे मागील काही दिवसांपासुन लाईनची समस्या जानवत आहे. रात्री, अपरात्री व दिवसा सुध्दा विद्युत पुरवठावारंवार खंडीत होत आहे तसेच काही भागात शिवरकर सोसाइटी येथे व्होलटेजची समस्या आहे.
तीव्र ऊन आणि उष्णता असल्यामुळे येथिल नागरीकांना लाईन नसल्यास मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागत आहे.
त्यासाठी किल्लावार्ड कुणबी सोसायटी येथे सध्या कार्यान्वित असलेले ६३ केव्हिचे विद्युत ट्रान्सफार्मरची क्षमता वाढवुन १०० केव्हिचे करणे व भविष्याची अडचन लक्षात घेता नविन १०० केव्हिचे ट्रान्सफार्मर बसविण्याबाबतचे निवेदन नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष तथा नगर सेवक प्रफुल चटकी यानी भद्रावती विद्युत मंडळ शहर अभियंता खनके यांना देण्यात आले.
सदर समस्या सोडविण्याचे आश्वासन अभियंत्यानी दिले आहे.