
दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला.
यामध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालयाने घवघवीत यश मिळविले. या परीक्षेसाठी एकूण ३७१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात ३६९ विद्यार्थी पास झाले.
शाळेचा एकूण निकाल ९९.४६% लागला असून खेड तालुक्यातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांच्या तुलनेत श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा सर्वाधिक निकाल लागला असून संस्था व शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
एस.एस.सी शालांत परीक्षेत डिस्टिंक्शन मध्ये ९६ विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये १५५ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीमध्ये ११६ विद्यार्थी तसेच पास श्रेणीत ०२ विद्यार्थी उतिर्ण झाले आहेत.
यामध्ये शिवांजली सचिनकुमार वीर या विद्यार्थिनीने ४७५/५०० (९५.००%) गुण मिळवून प्रथम, गीता अर्जुन रासकर या विद्यार्थिनीने ४७३/५०० (९४.६०%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला तसेच संस्कृत विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवण्याचा बहुमान प्राप्त केला. तर विकास रामचंद्र शिंदे या विद्यार्थ्याने ४७२/५०० (९४.४०%) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिव्यांग विभागातील मुलींनी १००% निकालाची परंपरा कायम ठेवली. यामध्ये अंजली ठाकर या विद्यार्थिनीने ७८.००% गुण मिळवून प्रथम, निकिता सावतकर ७३.००% गुण मिळवून द्वितीय तर विदिका रानेरजपूत व श्रीया वर्मा या विद्यार्थिनींनी ७२.८० गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. या दिव्यांग विद्यार्थिनींना संध्या भोज, सुनीता गिरी, मिनाक्षी पाटील, दिपाली घोलप, जयवंत खुंटे या अध्यापकांनी मार्गदर्शन केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक, इ. १० वी च्या समन्वयक सोनाली कातोरे, गुणवत्ता वाढ व विकास समिती यांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर, संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अनिता गावडे, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.