नंदलाल पाटील कापगते विद्यालयाची भरारी…

ऋग्वेद येवले

उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली – नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथील दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल उत्कृष्टरित्या लावून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली.

    विद्यालयातील एकूण परीक्षेला 134 विद्यार्थी प्रविष्ट होऊन 119 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यामध्ये प्राविण्य श्रेणीमध्ये 46 विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये 39 विद्यार्थी, द्वितीय श्रेणी मध्ये 30 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

    विद्यालयातून प्रथम क्रमांक येण्याचा मान मयूर दानेश्वर गहाणे 93.40%, द्वितीय कु.आर्या लीलाधर गायधने 92.20%, तृतीय प्रणय सुहास कापगते 91.60%, चतुर्थ कु. आर्या दिगंबर देशमुख 90.40%, कु.यामिनी बडवाईक 88%, कु.प्रांजल गहाणे 88%, वैभव काशीवार 87.80%, वेदांत कापगते 86.40%, कु.पायल कापसे 85.60%, कु. राशी राऊत 85.40%, कु. गायत्री मुंगमोडे 85℅, कु. सलोनी खोटेले 84.40%, कु. युक्ती लांजेवार 83.60℅, कु. पूजा कापगते 83.40℅कु. भौमिति खोटेले 83.40%, कु. भारती चोपकर 83.40℅

      नंदलाल पाटील कापगते विद्यालयातील विद्यार्थी हे कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये तालुक्यात नेहमी अग्रेसर असतात. हीच उज्वल यशाची परंपरा कायम राखत मानाचा तुरा उंचावत ठेवलेला आहे. 

     सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती रसिका कापगते, डी एस बोरकर ,एम एम कापगते , डी आर देशमुख, आर सी बडोले ,के.एम.कापगते, धनंजय तुमसरे ,आर बी कापगते, आर के खोटेले, एल एस गहाणे, यु एन कटकवार, आर व्ही दिघोरे, व्ही एच कापगते, भागवत मुंगुलमारे व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.