जय पेरसापेन माध्यमिक विद्यालय, माळंदा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार….

  भाविक करमनकर

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

               जय पेरसापेन माध्यमिक विद्यालय, माळंदा ता.धानोरा जि.गडचिरोली येथील शाळेचा निकाल 96.29% लागला. असून परीक्षेला एकूण 27 विद्यार्थी प्रविष्ट असून 26 विद्यार्थांनी परीक्षा दिली.

         त्यापैकी प्राविण्य श्रेणीत 11, प्रथम श्रेणीत 14, व्दितीय श्रेणीत 01विद्यार्थी उतीर्ण झाले.गुणानुक्रमे विद्यार्थी आदित्य रविंद्र बढई 82.80%घेऊन विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावीला.

         कु.तनुश्री चरणदास किरंगे 82.20% व्दितीय, हरिष नोहरू धुर्वे 81.60% तृतीय,कु.वैष्णवी धनीराम गावडे 80.00% चतुर्थ, कु.कशिष शामराव दुगा 78.60% पाचवे स्थान पटकावीले.

     त्याबद्द्ल अबूझमाळ शिक्षण मंडळ गडचिरोलीचे सचिव एस.एम.पठाण, सौ.प्राचार्या लिना हकीम यांनी शुभेच्छा दिल्या. उतीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय आई-वडिल व शाळेतील कर्मचारी वर्ग यांना दिले.