उमेश कांबळे
तालुका प्रतिनिधी भद्रावती
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात यशवंतराव शिंदे विद्यालय चिचोर्डी भद्रावती चा निकाल 85 टक्के लागला असून उत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे.
विश्वनाथ ठाकूर या विद्यार्थ्याने 80.20% गुण घेऊन शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला. तर मयूर झिलपे या विद्यार्थ्याने 79.20% गुण घेऊ द्वितीय क्रमांक घेतला, तर कु. पलक पाटील या विद्यार्थिनी 79% गुण घेऊन तिसरा क्रमांक प्राप्त केला.
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय चिचोर्डी भद्रावती येथील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ विशाल शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयंत वानखेडे, महादेव ताजणे सर, उमेश पाटील, आत्माराम देशमुख, सुहास कोल्हे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.