साकोलीत सट्टा व्यवसाय जोमात, पोलीस प्रशासन कोमात..

ऋग्वेद येवले

 उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली : अवैध मटका व जुगार व्यवसाय समुळ नष्ट करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत असते मात्र स्थानिक पोलिसांची कारवाई शून्य नियोजनामुळे वारंवार होणारी कारवाई फोल ठरत आहे.

          यापूर्वी ठोस पावले उचलून मटका बुकी मालकांच्या मुसक्या आवळणाऱ्या जिल्हा पोलीस प्रशासनाला साकोलीतील मटका जुगार बंद करण्यात अपयश येत असल्याने सर्वत्र खमंग चर्चा असून आश्चर्य व्यक्त होत आहे.

       साकोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बेकायदा मटका जुगार व्यावसायिकांचे प्रमाण फोफावत असल्याने अवैध व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या मोठा प्रश्न तालुक्यात निर्माण होत आहे. विशेषता मटका माफीया साकोलीत एक नसून सात ते आठ लोक स्वतंत्रपणे मटका जुगार चालवत आहेत.

          चौकात पान टपरीत सट्टा व्यवसाय असल्याची लोक चर्चेतून समजत आहे ‌.या सट्टा मटका माफीयांकडे साकोली तालुक्यातील गाव खेड्यात तसेच साकोली शहरांमध्ये विविध ठिकाणी यांचे एजंट द्वारे मटका संकलन केल्या जातो व कमी वेळात झटपट श्रीमंत होण्याच्या नादात रुपयावर 80 रुपये मिळत असल्याने बेरोजगार तसेच लालची प्रवृत्तीचे लोक या मटक्याच्या मागे लागलेले असून आजपर्यंत हे मटका किंग लाखो करोडो ने श्रीमंत होत आहेत मात्र मटक्यावर पैसा लावणारे गरीब बेरोजगार आणखीनच गरिबीच्या दरीत ओडल्या जात आहे.

         सर्व मटका माफिया व्यवसाय सुरळीत चालावे व त्यांचा वचक असायला पाहिजे म्हणून स्थानिक यंत्रणेला अर्थपूर्ण पद्धतीने सोबत घेऊन चालत असल्याने साकोली तालुक्यात व शहरात हा मटका व्यवसाय तेजीने व बेधडक होत असल्याचे लोकांमध्ये खुलेआम चर्चिले जात आहे तर जिल्हा प्रशासनाकडून यावर अंकुश लावण्यात येऊन मोहात गुंतलेल्या सामान्य नागरिकांना सट्टा मटका जुगार यातून दिलासा मिळावा अशी सुज्ञ नागरिक अपेक्षा बाळगून आहेत.

सेटलमेंट करून चालतोय खेळ 

  सट्टा मटका जुगार व अवैध दारू व्यवसायिकांना स्थानिक पोलीस गुन्हा अन्वेषण विभाग किंवा इतर विशेष पथकाच्या छापा पडणार नाही याची खात्री असल्याने कार्यक्षेत्रातील गावात संगणमताने व्यवसायांचा जम बसवण्यात आला आहे दरमहा लाखो रुपयांची उलाढाल होणाऱ्या या व्यवसायाने एक ना अनेक गावातील व्यावसायिकांनी सेटलमेंट गुरुशी संपर्क वाढविला असल्याचे दिसून येत आहे.