
बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
वादळी वाऱ्याने केळी पीक जमिनीवर कोसळल्यामुळे शेतकरी बळी राजा मेटाकुटी आलेला आहे. पिंपरी बुद्रुक ते नरसिंहपुर पर्यंत सर्व परिसरातील केळी पिकाचे 70 ते 80 टक्के नुकसान झालेले आहे.
नरसिंहपूर, टणु, गिरवी, गोंदी, पिंपरी बुद्रुक, सराटी, गणेशवाडी ,लुमेवाडी, शिंदेवस्ती, चव्हाण वस्ती,लिंबुडी ,या सर्वच भागात चार ते पाच दिवसा पूर्वी वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे केळी पिकाचे नुकसान झाले असून अध्यापही पंचनामे झालेले नाहीत. राज्य शासनाने ताबडतोब पंचनामा करण्याचे आदेश द्यावे ही या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
एकीकडे बळीराजावर कर्जाचा डोंगर तर दुसऱ्या बाजूने नैसर्गिक रित्या वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त पिकांचे नुकसान झालेले आहे.
कृषी सहाय्यक अधिकारी संदीप घुले मीडियाशी बोलत असताना म्हणाले की नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी रिपोर्ट करून कृषी विभागाकडे पाठवण्यास आम्हाला सांगितलेले आहे. केळी पिकासाठी पंचनामा आदेश आमच्याकडे आलेला नाही.
सर्वच परिसराची पाहणी करून केळीचे झालेले नुकसान पाहून पंचनामा करण्यात यावा व तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळावी.
चौकट
नुकसान ग्रस्त केळी पिकाची पाहणी रिपोर्ट करून कृषी विभागाकडे पाठवण्यासाठी आम्हाला सांगितलेले आहे. परंतु केळीचा पंचनामा करण्याची परवानगी आम्हाला मिळालेली नाही.सहाय्यक कृषी अधिकारी संदीप घुले.
चौकट
नरसिंहपूर येथील मोरे वस्ती या ठिकाणी वादळी वाऱ्याने राहत्या घराचे पत्रे उडाल्याने त्या भागातील नागरिकांना तातडीची मदत मिळावी. नीरा नरसिंहपूरचे सरपंच अर्चना नितीन सरवदे यांची मागणी.