इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त व्हावी ही स्वराज्याची जबाबदारी.:- युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : आळंदी आणि देहू या दोन्ही भूमीतून इंद्रायणी नदी वाहते. त्यामुळे तिचे वारकरी सांप्रदायिक माहात्म्य अलौकिक होय. या नदीत स्नान करणे म्हणजे मानवी देहाला पवित्र करून घेणे होय, अशी भाविकांची भावना आहे. मात्र, आजमितीस इंद्रायणी नदी फक्त कागदावर पवित्र नदी राहिली आहे. या नदीच्या उगमापासून संगमापर्यंत प्रदूषणाचा विळखा पडला आहे. केवळ नदीच नव्हे, तर काठावर आणि त्या लगतचा परिसर दुर्गंधीने व्यापलेला आहे. त्यामुळे नदीला नदी म्हणायची की नाला हेच समजत नाही. प्रदूषण थांबविण्यासाठी स्वराज्य संघटना नक्की लक्ष घालणार, इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी जे काही करता येईल ते नक्की केली जाईल, इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त व्हावी ही स्वराज्याची जबाबदारी आहे असे आश्वासन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी इंद्रायणी सेवा फौंडेशनला दिले.

          इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी गेली अनेक वर्षे जनजागृतीच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या वतीने युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांना सध्याची इंद्रायणी नदी बाबतच्या परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली आणि स्वराज्य प्रमुख युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी लक्ष घालावे अशी विनंती केली युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांना केली.