दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
जांभुळघाट ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी सरपंच सौ.रंजना मधूकर खेडेकर यांच्यावर विविध कारणांन्वये तहसीलदार चिमूर यांच्याकडे अविश्वास अर्ज २४ में ला दाखल केलाय.
या अर्जाला अनुसरून २६ में ला जांभुळघाट ग्रामपंचायतीच्या सभागृहात तहसीलदार चिमूर यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांची सभा बोलावली होती.
सरपंच सौ.रंजना मधुकर खेडेकर यांच्यावर अविश्वास मंजूर करण्यासाठी सभेमध्ये ७ सदस्यांची उपस्थिती आवश्यक होती.
मात्र अविश्वास सभेला सहा सदस्य उपस्थित असल्याने सरपंच सौ.रंजना मधुकर खेडेकर यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला..
९ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या ग्रामपंचायत अंतर्गत महिला सरपंच्यावर अविश्वास दाखल करताना अविश्वास अर्जावर ७ सदस्यांच्या सह्या असणे आवश्यक होत्या.
अविश्वास अर्जावर ७ ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या नसताना अविश्वास पात्रता अनुषंगाने चिमूर तहसीलदार यांनी सदर अर्जाला मान्य करून ग्रामपंचायत जांभुळघाट सदस्यांची अविश्वास सभा दिनांक २६ में ला तडकाफडकी म्हणजे केवळ २ दिवसात बोलावली.हा सभा प्रकार अनेकांच्या चर्चेचा विषय बनला.
तद्वतच दोन तृतियांश मताला अनुसरून अविश्वास ठराव सभा बोलावण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांना आहे हे नाकारता येत नाही.
तद्वतच ६ सदस्यांच्या सह्या अंतर्गत अर्जाला अनुसरून अविश्वास ठराव सभा नियमानुसार बोलावली जात असेल तर अविश्वास ठराव मंजूर होईल याची हमी कुणीही देऊ शकत नाही.किंवा कमी सदस्यांच्या सह्या अंतर्गत अविश्वास ठराव सभा बोलावण्यावरुन आर्थिक घोडेबाजाराचा मार्ग आपोआपच मोकळा होतो असे म्हणण्यास हरकत नसावी.
मात्र,आर्थीक घोडेबाजार कधी यशस्वी ठरतो तर कधी अयशस्वी ठरतो असे बरेचसे घटनाक्रम समोर आहेत.
अविश्वास ठराव मंजूर व्हावा यासाठी काही पक्ष पदाधिकाऱ्यांकडून आर्थिक लेनदेन करण्यासाठी प्रयत्न सुरू होते,मात्र त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला नाही.असी जांभुळघाटच्या नागरिकांत खमंग चर्चा सुरू आहे.
सभेचे कामकाज तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी स्वतः पारदर्शकता अंतर्गत पार पाडले.
सदर सभातंर्गत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून भिसी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
ग्रामपंचायत अविश्वास ठरावा बाबत वरील पत्रकान्वये नियमावली..