नवीन संसद भवनाचे उद्घाटन आणि विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर.. — त्यांना इतिहास नाकारेल व ते इतिहास जमा होतील…

 

  संपादकीय

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक

      प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन २८ में रोज रविवारला थाटात संपन्न होणार आहे.

      उद्घाटन कुठल्या पद्धतीने होते हे संबंधित शोहळा सुरू असताना किंवा पार पडल्यानंतर लक्षात येईलच..

             तद्वतच नवीन संसद भवन बांधण्याचा उदेश काय?आणि संसद भवनासमोर जगविख्यात प्रकांड पंडित तथा महामाहानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा नसने यावर बऱ्याच चर्चा देशात रंगत आहेत.

          मात्र,संसद भवन बांधण्याचा उदेश कुठलाही असो किंवा संसद भवनाचे उद्घाटन करण्याचा दिवस कोणताही असो यावर अनावश्यक चर्चा होणे बरोबर नाही.

        तद्वतच संसद भवन हे भारत देशाचे आहे आणि या संसद भवनात लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार हे भारतीय नागरिकांच्या प्रती आपले कर्तव्य संविधाना नुसार पार पाडतील हा कार्यभाव व कार्यभाग देशातील नागरिकांनी प्रथमतः लक्षात घेतला पाहिजे.

         भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून देशहिताच्या दृष्टीने प्रधानमंत्री,त्यांचे मंत्रीमंडळातील सहकारी व खासदार काम व कार्य करणार हे अपेक्षित असते.

           मात्र,ते संविधानाच्या चौकटीत राहून देशातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी,उन्नतीसाठी,संरक्षणासाठी,काम व कार्य करणार नसतील तर असे लोकप्रतिनिधी इतिहास जमा होतात आणि नागरिकांच्या मनातून कायमचे उतरतात हे लक्षात घेतले पाहिजे.

            जे लोकप्रतिनिधी लोकांच्या सर्वांगीण हिताकडे दुर्लक्ष करतात ते इतिहास जमा होतात व लोकांच्या मनातून उतरतात म्हणजे लोकशाहीला अपेक्षित प्रगल्भ कार्य करीत नाही आणि संविधानाच्या चौकटीत राहून लोकहितार्थ कर्तव्य पार पाडत नाही असा त्याचा सरळ अर्थ आहे.

           भारतीय संविधानाच्या चौकटीत काम व कार्य न करणारे असे लोकप्रतिनिधी म्हणजे प्रधानमंत्री,त्यांचे मंत्रीमंडळातील सहकारी व खासदार हे नवीन संसद भवनात बसले काय आणि जुन्या संसद भवनात बसले काय? काही फरक पडत नाही.

         जे लोकप्रतिनिधी देशातील नागरिकांच्या सर्वकश उन्नतीसाठी,संरक्षणासाठी,”तनमन-धनातंर्गत अर्थ संकल्पीय बजेटच्या माध्यमातून अंतःकरणपुर्वक कर्तव्य पार पाडतात ते लोकप्रतिनिधी देशात व परदेशात लोकप्रिय ठरतात.

             राहिली बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांची कर्तव्यनिष्ठता?”तर,संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची कार्यपध्दत समता,स्वातंत्र्य,बंधुत्व,व न्यायाला अनुसरून समभाव होती.यामुळे भारत देशातील कुठल्याही नागरिकांवर अन्याय व अत्याचार होणार नाही किंवा या देशातील कोणत्याही नागरिकांचे शोषण होणार नाही,याची काळजी त्यांनी संविधानाच्या माध्यमातून घेतली आहे.

        याचबरोबर देशातील सर्व नागरिकांचा समतोल विकास व्हावा अशी त्यांची कर्तव्यनिष्ठ कार्यपध्दत होती.यामुळे भारत देशातंर्गत जगविख्यात प्रकांड पंडित डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कोणी कितीही दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला तरी या देशासह जगातील नागरिकांच्या नजरा त्यांच्या महान कार्याकडे लागलेल्या असतात हे विसरून चालता येणार नाही.

          अर्थात भारत देशातील सर्व नागरिकांचे तारणहार ठरलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नाकारण्याचा प्रयत्न जे जे राज्यकर्ते व सत्ताधारी करतील किंवा त्यांच्या महान कार्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतील ते स्वतः दुर्लक्षित होतील व निसर्ग नियमानुसार ते सर्व दंडीत होतील या सत्याला सुध्दा पुढे जावे लागेल.

           म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा नवीन संसद भवनासमोर उभारण्यात आला नाही म्हणून त्यांच्या महान कार्याचे महत्त्व कमी होत नाही हे सुद्धा तितकेच खरे आहे.

       याचबरोबर हे सत्य असेल की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नाकारु इच्छिणाऱ्यांना जगाचा इतिहास नाकारेल,जगातील नागरिक नाकारतील…