दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
चिमुर – गोंदिया जिल्हातंर्गत देवरी तालुक्यातील मौजा चिचगड पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या ग्राम गोटानपार येथील एका अल्पवयीन आदिवासी मुलीला दि.२० एप्रिल रोजी काही नराधमांनी उचलून नेवून तिच्यावर अमानुष अत्याचार केला व तिचा निर्घृण खून केला.
माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून हदय हेलावणारी आहे.घटनेला एक आठवडा लोटला तरी खूनातील आरोपींचा अजूनही शोध लागला नाही.यांमुळे पोलिसांचा नाकर्तेपणा नजरेस येत आहे.
यासंबंधी अखिल भारतीय युवा आदिवासी विकास परीषद नवी दिल्ली अंतर्गत शाखा चिमूर तालुका कार्यकारीणीच्या वतीने तालुकाध्यक्ष ओंकार कोवे यांच्या मार्गदर्शनात आज दि. २५ एप्रिल २०२४ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी देवरी पोलिसांनी आरोपींचा युद्ध पातळीवर शोध घेवून त्यांना जेरबंद करून जलदगती न्यायालयात निवाडा करावा,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.आरोपींना शोधण्यास दिरंगाई झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद चिंमुर तालुकाध्यक्ष ओंकार कोवे,नितेश गीरोले,सूरज कुळमेथे,सुशांत इंदूरकर,गणेश वांढरे,घनश्याम देवतळे,किशोर चौधरी,नितेश देवतळे,दिवाकर वाकडे सह तालुका कार्यकारीणीचे पदाधिकारी व सदस्यगण मोठया संख्येने उपस्थित होते.