“जनता,सुप्रीमकोर्टाचे वकील,देशातील इतर राज्यातील वकील या सर्वांनी मिळून रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढून…….
शेवटी जनतेचा,लोकशाहीचा,संविधानाचा पराभव आणि कुटनीती व EVM + VVPAT चा विजय सुप्रीमकोर्टाने केला……
**
कारणे काय सांगितली?
तर जगात जरी EVM अनुभव घेऊन लाथाडले असले तरी,आमची मतदार लोकसंख्या जगात सर्वात जास्त आहे. म्हणून आमच्याकडे EVM + VVPAT च योग्य आहेत.
त्याचप्रमाणे VVPAT ची 100%मोजणी व पडताळणी आचारसंहिता लागू झाल्यामुळे आताते शक्य नाही….
केरळमध्ये मॉकड्रिल मध्ये जर भाजपला काही मते जास्त पडली असतील तर लगेच चुकून झालेल्या चुकीमुळे सर्व EVM यंत्रणाच चुकीची आहे म्हणणे योग्य नाही…..
याचिकाकर्त्यांच्या सर्व सांशक प्रश्नांना सुप्रीमकोर्टाने निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारून,काही जाब विचारून ताकीद देऊन असं यापुढे होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाला क्लीन चीट दिली….!
**
परंतू,जी कारणे देऊन सुप्रीमकोर्टाने निवडणूक आयोगाला क्लीन चीट दिली,सर्व याचिका खारीज केल्यात,त्या याचिकाकर्त्यांची म्हणणे काहीही झाले तरी केवळ ऐकून घेऊ,पण निकाल मात्र EVM च्याच बाजूने घेऊ असं जणूकाही पूर्वीपासून ठरविल्याप्रमाणे निकाल दिला.पण जनतेला ‘ न्याय ‘ नाही दिला….
बरं!सुप्रीमकोर्टाने सांगितले की,आचारसंहिता लागू झाल्यावर EVM हटविणे किंवा VVPAT ची 100% मोजणी आता शक्य नाहीं…..
या सर्व याचिका किती महिन्यापासून प्रलंबित होत्या……?
सुप्रीमकोर्टाच्याच वकिलांचे आंदोलन, जनतेचे आंदोलन, किती महिन्यापासून चालू होते….?
याचा विचार कोर्टाने करायला हवा होता…..मॉक ड्रिल म्हणजे सॅम्पल असते, त्या सॅम्पलमध्ये पुरावे सापडून दुर्लक्ष करणे हे कितपत योग्य आहे…?
म्हणून,आता…..
जनतेच्याच सर्वोच्च न्यायालयात….. जागृतीच्या न्यायालयात लढाई लढणे आवश्यक आहे….
गेली 10 वर्षे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकही पत्रकारपरिषद घेतली नाही…..!
2014 आणि 2019 च्या एकाही घोषणाची पूर्तता केली नाही…..!
गॅस आणि डिझेल,पेट्रोलचे भाव 10 वर्षात गगनाला भिडले…..!
विरोधी पक्षांचे पंख छाटून म्हणजेच गुजरातच्या वॉशिंग पावडरने भ्रष्टाचाराने कलंकित झालेल्याना शुद्ध करून घेतले आणि निर्लज्जपणे लगेचच त्याविषयी मौन धारण केले…….!
असे असतांना…….
2019 मध्ये अब की बार 300 पार म्हणत EVM च्या बळावर लक्ष गाठले……!
आता 2024 मध्ये अब की बार 400 पार म्हणत जर तसे झालेच किंवा स्पष्ट बहुमतात आले किंवा येणकेण प्रकारे पुन्हा एकदा हॅट्ट्रिक यांनी केलीच तर…….
याला काय समजावे….?
10 वर्षाच्या कामाची पावती समजावी का….?
कारण या देशाचा आजपर्यंतचा इतिहास आहे, की कोणतेही सरकार, कितीही चांगले काम प्रामाणिकपणे जरी केले असले तरी तिसऱ्यांदा कधीही सत्तेवर लोकशाहीत येऊ शकत नाही…….
जर असा 10 वर्षाचा इतिहास असतांना यांनी हॅट्ट्रिक केलीच तर मग EVM चाच विजय समजावा….!
तसे जर झालेच किंवा अब की बार 400 पार स्वप्न साकार झालेच……
तर,निदान जनतेच्या समाधानासाठी सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाला आदेश देईल का?
की आता तुम्ही कोणतेही 10 मतदार लोकसभा मतदारसंघ घ्या जिथून भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकली असेल त्या 10 मतदारसंघात पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर पुनरमतदान घ्या आणि मग त्या 10 ही ठिकाणी भाजपचा पराभव झाला तर मग……..
आपण तो निकाल पाहुन दुसऱ्यांदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचे आदेश देणार का…..?
हतरच आमचा देश आणि व्यवस्था लोकशाही मार्गाने आहे हे सिद्ध होईल…..
अन्यथा,आम्ही अराजकतेच्या दिशेने कोरोनाच्या गतीने धावत जाऊ…..
हे कदापि संविधाननिष्ठ भारतीय नागरिक खपवून घेणार नाही…..
कारण,आम्हाला ( भारतीय जनतेला ) 5 वर्षातून एकदाच मिळणारा हा मूलभूत हक्कात सर्वोच्च स्थानी असलेला मताचा अधिकार EVM ला आणि आमच्यासाठी निर्माण झालेल्या व्यवस्थेला हिरावून घेऊ देणार नाही……
नाहीं……
नाहीच…..!
त्यासाठी वाट्टेल ते करण्यासाठी आमची तयारी…………
आवाहनकर्ता..
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689