लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा – प्रशासन व विधी सेवा कडून आवाहन… — 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन…

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

गडचिरोली,(जिमाका)दि.27: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.बी. शुक्ल यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्यावतीने दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी रविवारला राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली तसेच तालुका न्यायालय, अहेरी, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा, सिरोंचा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी दावे असे प्रलंबित वाद तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच किरकोळ गुन्हे कबुल करणाऱ्यांसाठी न्यायालयात विशेष मोहिम राबवली जात आहे.

तसेच राष्ट्रीय लोक अदालतमध्ये कोणकोणती प्रकरणे ठेवण्यात येवू शकतात आणि त्यासंबंधीची प्रकरणांची माहिती, लोकअदालतीमुळे दोन्ही पक्षांना होणारे फायदे, त्यामुळे दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी आयोजित लोकअदालत यशस्वी करणेकरीता अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, गडचिरोली यु.बी.शुक्ल, जिल्हाधिकारी गडचिरोली, संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली कुमार आशिर्वाद, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. निलोत्पल, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली आर.आर. पाटील, यांनी राष्ट्रीय लोकअदालतचा फायदा जास्तीत जास्त जनतेला घेता यावा आणि लोकअदालत मध्ये जास्तीत जास्त प्रकरण ठेवण्याबाबत जनमानसात जनजागृती व्हावी याकरीता जनतेला आवाहन केले आहे.