जिल्ह्यात 144 कलम लागू…

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

गडचिरोली,(जिमाका)दि.27: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 रविवार, दि.30 एप्रिल 2023 रोजी गडचिरोली येथील विविध 24 उपकेंद्रावर सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत घेण्यात येत असल्याने, परीक्षा संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत. परीक्षा कालावधीत विवक्षीत कृती करण्यापासून परावृत्त करणे तसेच शांतता तथा सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने, प्रत्येक परीक्षा उपकेंद्रावर सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यत पोलीस कर्मचारी तैनात ठेवणे आवश्यक आहे. 

जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करुन परिक्षा केंद्राच्या 100 मिटरच्या परिसरातील परिक्षा उपकेंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती परीक्षार्थी व परिक्षेसी संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळून एकत्रितरित्या प्रवेश करण्यास मनाई आहे. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. कोणत्याही व्यक्तीकडून परिक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतेही बाधा उत्पन्न करु नये. 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, झेरॉक्स सेंटर, सायबर कॅफे, पानपट्टी, फॅक्स केंद्र, टायपिंग सेंटर, एस टी डी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे परिक्षा सुरु होण्यापुर्वी 2 तास व परीक्षा सुरु असण्याचा संपुर्ण कालावधीत बंद राहतील. परिक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस/वाहनास प्रवेशास मनाई राहील. परिक्षा केंद्राचे परिसरात परिक्षेच्या कालावधित ध्वनीप्रदुषणामुळे परिक्षार्थिंना त्रास होईल असे कृत्य करु नये. कोवीड-19 चे अनुषंगाने, शासनाने वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या नियमावलीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. असेही आदेश निर्गमीत केले आहे.

     हे आदेश परिक्षा केद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी, निगराणी करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे बाबत त्याचे परिक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागु राहणार नाही. तसेच हे आदेश दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी 9.00 वाजेपासून दुपारी 2.00 वाजेपर्यंत परीक्षेच्या दिवशी संबंधित परीक्षा उपकेंद्राचे ठिकाणी लागू राहतील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.