महिलांचा पिण्याच्या पाण्यासाठी हा हा कार…. — साकोली नगरपरिषदेचे दुर्लक्ष…

 

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

साकोली : साकोली मधील प्रभाग क्रमांक 8 मधील अमराई चौकात पिण्याच्या पाण्यासाठी नगरपरिषद ला महिलांनी निवेदन दिले.परंतु नगरपरिषद यांनी त्याच्या निवेदन ची काहीही दखल न घेता त्यांना 8 दिवसाची वेळ दिली तरी ही नगरपरिषद नी आतापर्यंत काहीच उपाययोजना करुन दिलेला नाही. अश्या वेळी फ्रिडम चे अध्यक्ष किशोर बावणे यांना काही महिलांनी कॉल करुन त्यांना आपली समस्या सांगितली. त्यांनी सांगितलं की बोरवेलला

 पाणी खराब येते त्याचा दुष्परिणाम आमच्या मुलाबाळा वर होते.पाण्यासाठी आमाला खुप दूर जावं लागतं आहे. आज आमच्या प्रभागात काहीच सोय नाही. आम्ही साकोली मध्ये राहतो की साकोली बाहेर राहतो. आम्ही नगरपरिषद चा सर्वं कर भरतो तरी आमच्या प्रभागात काहीच सोय नाही. बरोबर रस्ता नाही.100/150लोकवस्ती मध्ये फक्त दोन बोरवेल आहेत. त्यांना पण पाणी बरोबर येत नाही. उन्हाळा मध्ये आम्हाला पाण्याची खुपच अडचण भासते. जे मोठे लोक आहे त्यांना काहीच अडचण नाही. पण आम्ही गरीब लोक कुठे जाऊन. त्यावर काही तोडगा काढून आमची समस्या दूर करावी. नाहीतर आम्ही सर्व महिला नगरपरिषद वर घागर मोर्चा घेऊन जाऊ असा इशारा महिलांनी दिला आहे.