
बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
भरतरीनाथाचा आशीर्वाद व आई-वडिलांची पुण्याई पाठीशी असल्यामुळे टणु गावचा सरपंच झालो याचा मला आज आनंद आहे सरपंच तेजस मोहिते यांचे निवडी प्रसंगी उद्गार…
टणु तालुका इंदापूर येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदी तेजस मोहिते- पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
निवडी प्रसंगी सरपंच तेजस मोहिते बोलत असताना म्हणाले की टणु गावचे ग्रामदैवत भरतरी नाथांची पावन भूमी व आई-वडिलांचा आशीर्वाद आणि टणु ग्रामस्थांचे सहकार्य पाठीशी खंबीरपणे उभे असल्यामुळे मी आज सरपंच झालो.
सर्वांनीच माझ्यावर विश्वास दिला,इथून पुढच्या काळामध्ये गोरगरीब ग्रामस्थ नागरिकांचे प्रश्न मार्गी लावीन. महाराष्ट्र शासनामार्फत येणाऱ्या सर्व सुविधा गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच माझा प्रयत्नही राहील.सर्वांचे सहकार्य घेऊन गावचा विकास चांगल्या पद्धतीने करीन सरपंच तेजस मोहिते यांचे निवडी प्रसंगी उद्गार.
टणु गावचे विद्यमान सरपंच वैभवी तेजस मोहिते यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या जागेवर तेजस मोहन मोहिते यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे कामकाज बावडा विभागाचे सर्कल मल्लाप्पा ढाणे व ग्रामसेवक गणेश लंबाते यांनी केले.
माजी सरपंच समीर मोहिते, साखर कारखान्याचे संचालक प्रकाश मोहिते, माजी उपसरपंच राजेंद्र मोहिते, प्रकाश मोहिते, दत्तात्रय मोहिते, मच्छिंद्र जगताप, विलास मोहिते, बापूराव जगताप, राजेंद्र जगताप, अर्जुन जगताप, बाळासो जगताप, अजित मोहिते, राजेंद्र चव्हाण, संभाजी मोहिते आदी ग्रामस्थांच्या उपस्थितीत सरपंच तेजस मोहिते यांचा सन्मान केला.
टणु गावच्या सरपंच पदावर तेजस मोहिते यांनी पदभार घेतल्यानंतर संपूर्ण गावातून हलग्यांच्या आवाजात वाजत गाजत सरपंच तेजस मोहिते पाटील यांची गावामधून जंगी मिरवणूक काढली.