वडसा,कुरखेडा व कोरची तालुक्यात आणि गाव खेड्यात सट्टा पट्टी… — अवैध धंद्यांना आवर घालणार कोण? 

ऋषी सहारे 

  संपादक

गडचिरोली :- जिल्ह्यातील वडसा, कुरखेडा व कोरची तालुक्यात तसेच तालुक्यातील गाव खेड्यात सट्टा पट्टी अवैध धंधा मोठ्या प्रमाणात व सरसकट सुरू असून संबंधित विभाग फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचे बोलल्या जात आहे.

        आदिवासी बहुल गडचिरोली जिल्हा तसा गरिबीने ग्रासला आहे पण अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने गरीब पुन्हा गरीब होत चालले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत.

         मुख्य म्हणजे सट्टा पट्टी हा एक लुटमार करणारा अवैद्य व्यवसाय आहे. यात शंभर आकड्यावर सट्टा लावल्या जातो व एक आकडा ग्राहकास मिळतो बाकी सर्व नव्यानंव् आकडे चालक मालक घेत असतो त्यामुळे लावणारे कंगाल होतात आणि घेणारे मालामाल होतात.

        वडसा शहरात स्वतःचे टाल लावून चीटोऱ्यावर गेम खेळला जातो तर विसोरा गावातून येणारा चालक हा मालामाल झाला असल्याचे बोलल्या जात आहे. संपूर्ण वडसा तालुक्यात वीसोरा येथील व्यक्ती चालक मालक असल्याने संपूर्ण तालुक्यावर त्याचेच नियंत्रण असल्याचे म्हटले जाते तर कुरखेडा तालुका सट्टा पट्टी चा माहेर घर आहे असे ही म्हटले जाते त्यात कुरखेडा व कोर्ची तालुक्यातील एजेंट कुरखेडा इथ पट्टी देत असून येथील एक व्यवसायिक नावापुरतीच दुकान लावून सर्व दोन्ही तालुक्यावर नियंत्रण ठेवत असल्याचे बोलले जाते.

          कोरची तालुका छत्रपति चे अंडर मध्ये असून बाहेरून आलेला व्यक्ती कोरची तालुक्यात आपले जम बसवल्याचे म्हटले जात आहे.

         सबंधित तिन्ही तालुक्यातील अवैध सट्टा पट्टी व्यवसाय चालविणाऱ्या तिन्ही तालुक्याचे नियंत्रक DYSP यावर गांभीर्याने लक्ष देऊन अशा अवैध व्यवसायाला आळा घालतील का?याकडे लक्ष लागून आहे.