
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा हरणी नदीच्या पात्रातून अवैध वाळूचे जोरात उत्खनन सुरू आहे.या उत्खननामुळे मौजा हरणीवासियांचे नैसर्गिक आणि जलपातळीचे अतोनात नुकसान झाले आहे.तद्वतच अवैध वाळू उत्खननामुळे पाण्याची पातळी खोलात गेल्याने आणि निसर्गाचे संतुलन धोक्यात आले असल्याने शेतकऱ्यांच्या शेत उत्पादनावर गंभीर परिणाम पडत आहे.
यामुळे त्यांनी आज रात्रो पहाटे ३ वाजताच्या दरम्यान अवैध वाळू उत्खनन करणेवाल्या वाळू चोरांकडे आपले एकसंघ शक्ती द्वारे कर्तव्य वळविले आणि जिथून वाळू उपसा होत आहे त्याठिकाणी डेरा टाकत ९ वाळू भरलेले ट्रॅक्टर पकडले.
वाळू भरलेले ट्रॅक्टर पकडल्यावर त्यांनी चिमूर पोलिसांना संपर्क केला व अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या अनेक ट्रॅक्टरला पकडले असल्याची मौजा हरणीवासियांनी माहिती दिली.
यानंतर लगेचच ठाणेदार संतोष बक्काल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन चिमूर/पोलिस चौकी नेरीची टीम मौजा हरणी नदीच्या पात्रात पोहचली.चिमूर पोलिसांनी अवैध वाळू उत्खननातंर्गत स्थळ पंचनामा करण्याचे काम सुरु करीत असतानाच मोका स्थळावरुन ९ पैकी ३ ट्रॅक्टर चालकांनी वाळू भरलेले ट्रॅक्टर घेऊन धुम ठोकली असल्याची गंभीर घटना घडली आहे.
वाळू भरलेले ३ ट्रॅक्टर पळवून नेणारे ट्रॅक्टर चालक कोण आहेत आणि सदर ट्रॅक्टर कुणाचे आहेत याचा शोध पोलीस घेणार काय?असा ज्वलंत प्रश्न मौजा हरणी वाशियांना पडला आहे.
मात्र,वाळू भरलेले ट्रॅक्टर पकडण्याचे काम महसूल,पोलिस,खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी करायला पाहिजे होते.सदर तिन्ही विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वाळू तस्करांना पकडत नसल्याने ते काम मौजा हरणी वाशियांनी केले.
यामुळे त्यांच्या हिंमतीला आणि एकसंघ शक्तीला सलाम करावे लागेल असाच त्यांचा अवैध वाळू चोरांना मुद्दे मालासह पकडून देणारा लौकिक आहे.
अवैध वाळू उत्खननाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जनमानसात थू थू होत आहे,या सारखी लाजिरवाणी बाब दूसरी असू शकत नाही!..
वाळू चोरांची वाढलेली हिंमत अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या नाकार्तेपणा मुळेच होय,हे उघडच आहे.
पळवून नेलेल्या ट्रॅक्टर चालकांवर संशयित आरोपी म्हणून वाळू चोरीचे गुन्हे दाखल का म्हणून करण्यात येत नाही? किंवा पकडलेल्या ट्रॅक्टर चालकांवर व ट्रॅक्टर मालकांवर वाळू चोरीचे गुन्हे दाखल न करण्याच्या मागे राजकीय दबाव आहे की आपसी संबंध आहेत हे सुद्धा पोलिस विभागांनी समोर आणले पाहिजे या मताची जनता आहे…
अन्यथा यापुढे जिल्हाधिकारी चंद्रपूर व जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर हे मोका स्थळावर आल्याशिवाय वाळू भरलेले ट्रॅक्टर स्थानिक गावकरी सोडणार नाही याची दक्षता स्थानिक अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घेणे आवश्यक आहे.
मात्र,हरणीवाशियांनी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान नेमके किती ट्रॅक्टर पकडले व चिमूर पोलिसांनी नेमके किती ट्रॅक्टर जमा केले याबाबत सत्य माहिती अजूनही लोकचर्चेचा विषयातच घुमत आहे.