
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चिमूर तालुकातंर्गत होणारे वाळूचे अवैध उत्खनन रोखण्यासाठी स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत नसल्यामुळे चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किर्तीकुमार भांगडीया हे वाळूच्या अवैध उत्खननावर लगाम लावण्यासाठी पुढे येणार काय?हा पोटतिडकीचा प्रश्न त्यांच्यासाठी उपस्थित होतो आहे.
चिमूर तालुकातंर्गत अवैध उत्खनना द्वारे परजिल्ह्यात दररोज नेण्यात येणारी वाळू कुणाच्या आशीर्वादाने नेल्या जात आहे यावर चिमूर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,तहसीलदार श्रिधर राजमाने चूपी साधून आहेत.
परिणामी अवैध वाळू उत्खननाकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नसल्याचे ते स्पष्ट मान्य करीत आहेत?.याचबरोबर निष्पक्ष कर्तव्य पार पाडण्याची ज्यांना भिती वाटतय ते अधिकारी कसे काय झाले? याबाबत जनचर्चेचा विषय ठरु नये याची दक्षता त्यांनीच घ्यायला हवी.
अवैध वाळू उत्खननातंर्गत वाळू दुलाई करणारे हायवा वाहान हे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे नाही तर त्यांच्या जवळील संबंधितांचे आहेत काय?असा मुद्दा सुध्दा लोकचर्चेचा विषय बनला आहे.
वाळू सारखी खनिज संपदा ही जनतेची म्हणजे शासनाची आहे.या खनीज संपदेला लुटू देण्यासाठी आमदार आणि अधिकारी राहात नाही तर त्या खनिज संपदेचे संरक्षण करण्यासाठी असतात हे सरळ आणि सोपे अधिकारीक सुत्र असताना हेच जबाबदार व्यक्ती अवैध वाळू उत्खननाकडे पाठ फिरवित असतील तर त्यांचा सहभाग वाळू चोरी प्रकरणात आहे असे जनतेला वाटू नये याची काळजी ते वेळीच घेतील काय?हा प्रश्न सुध्दा तितकाच महत्वपूर्ण आहे.
चिमूर येथील उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,तहसीलदार श्रिधर राजमाने,याचबरोबर चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा, आमदार किर्तीकुमार भांगडीया हे चिमूर तालुकातंर्गत अवैध वाळू उत्खननाकडे लक्ष देत नसतील तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष द्यावे काय? याचे उत्तर चिमूर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,तहसीलदार श्रिधर राजमाने यांनी द्यायलाच हवे.
पाच ते दहा हायवा वाहानाद्वारे चिमूर तालुक्यातून परजिल्ह्यात दररोज वाळू नेत असताना झोपा काढत असलेले अधिकारी चिमूर तालुक्याला नकोत,अशीच जनभावना आता त्यांच्या प्रती तयार होत आहे.
आमदार किर्तीकुमार भांगडीया सुध्दा अवैध वाळू उत्खननावर भाष्य करीत नाही,याला काय म्हणावे?