औरंगजेबची समाधी,धर्म आणि राजकारण…

        आर.एस एस.ची राजकीय शाखा म्हणजे भाजपा पक्ष,आणि सामाजिक शाखा म्हणजे बजरंग दल.बजरंग दलास आपलाच पक्ष सत्तेत असल्यामुळे हिम्मत आली आणि त्यांनी ” औरंगजेबाची समाधी हटाव ” हा इश्यू ऐरणीवर घेतला.प्रथम नागपूर मध्ये यास तोंड फुटले.आणि आता सर्व भारतभर हा विषय धुमाकूळ घालीत आहे,हिंदू मुस्लिम यांचेत तेढ निर्माण होऊन दंगे धोपे,जाळपोळ होताना दिसते आहे,यातून काय साध्य होणार आहे ? हे माझ्या सारख्यांना तर समजणे कठीण झाले आहे,याचा अर्थ हे माझ्यासाठीच नव्हे,तर माझ्यासारख्या विचार करणाऱ्यांना अनेकांना प्रस्न सातवीत आहे,की शेकडो किंवा हजारो माणसांचा जीव देऊन ,हिंसा घडून,जाळपोळ करून,दंगे ढोपे करून,करोडो रुपयांची खाजगी किंवा सरकारी,सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून औरंगजेबाची समाधी हटाउन शेवटी हाती काय ? तर दोन धर्मात कायमची नफरत,बदल्यांची भावना,शत्रुत्व.

        हे का करायचे तर ” आपली राजकीय पोळी” भाजण्यासाठीच ना ? अरे ,तुम्हाला सत्ताच हवी ना ? आणि तीही कायमची हवी ना ? मग बहुमत हिंदूचे असताना घाबरता कशाला? बहुमत बिघडवण्या ऐवजी,ते दूषित करण्या ऐवजी,हिंदूंना कायमचा शत्रू निर्माण करून ठेवण्या ऐवजी, त्यांचेत मुस्लिमां बद्दलची कायम भीती ठेवणे ऐवजी,किंवा मुस्लिम समाजात हिंदूंची कायम भीती ठेवण्या ऐवजी ,हिंदुधर्म म्हणजे काय ? इतर धर्माचा आदर करूनही,त्यांचेशी बंधुभाव ठेऊनही आपण संघटित कसे राहता येईल ? आणि हिंदुचीच सत्ता कायम कशी ठेवता येते ? या बद्दलची शिकवण हिंदूंना द्या ना.धर्माभिमान जरूर बाळगा.पण धर्मांध आणि सत्तांध बनू नका.असे झाले तर आपणास आपला इतिहास माहीत आहे,की धृतराष्ट्राचे काय झाले ? महाभारत का घडले ? शेवटी बहुसंख्य असलेल्या कौरवा चे काय झाले? आणि अल्पसंख्य पांडवांचे काय झाले ? युद्ध झाले,त्यात लाखो निरपराध सैन्य मेले.पण विजय मात्र सत्याचाच झाला.पण अनेक निरपराध माणसांचा बळी गेला.असेच अशा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टीमुळे हजारो हिंदू मुस्लिम माणसाचे जीव जाणार.कशासाठी तर केवळ सत्ता मिळवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी.

      हिंसा करूनच सत्ता हवी का? अहिंसेच्या मार्गाने ती घेता येत नाही का ? संघर्षाच्या,कायद्याच्या,संविधानाच्या,मत परिवर्तनाच्या,लोकशाहीच्या मार्गाने तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवता येत नाहीत का? त्यासाठी तुम्हाला हिटलर मुसोलिनी अश्या हुकूमशहाचाच आदर्श हवा कशाला ? कार्ल मार्क्स तर म्हणाला की,” धर्म ही अफूची गोळी आहे,ती घेतली की माणूस कायम तिच्या नसेत असतो”. असे असेल तर ” हिंदू ” नावाची अफूची गोळी घेतलेला भारतीय हिंदुस्तानी समाज मोठ्या प्रमाणात आहे,मग घाबरता का ? मार्ग मोकळा आहे,फक्त अडचण आहे,त्यांना या प्रस्नावर संघटित करण्याचा.पण यासाठी जो ” नफरातीचा ” मार्ग धरला आहे,तो चुकीचा आहे,तो सोडून भाईचारा ,बंधुभाव ,मत परिवर्तन हा मार्ग धरावा लागेल.

         खरे तर औरंगजेबाची समाधी हटाव,हा प्रश्नच होऊ शकत नाही,कारण आता सर्वांना भारतीय संविधान नुसार चालावे लागेल.कारण ते सर्व भारतीयांनी अंगीकृत केले आहे,जे सर्व धर्मियांच्या,सर्व जातीच्या न्यायचे ,कल्याणाचे , सामंजसचे आहे.आनी लक्षात घेण्याची बाब ही की ,हा प्रस्न एका धर्माचा नसून दोन धर्माशी संबंधित आहे.म्हणून दोन्ही धर्मियांना विश्वासात घेऊनच हा प्रस्न सोडविणे योग्य आहे.ते शक्य नसेल तर न्यायालय आहे.संविधान आहे,लोकशाही आहे,हे सारे अहिंसेचे मार्ग असताना जीवित हानी,मालमत्तेची हानी असे हिंसेचे मार्ग वापरून जर प्रस्न सोडवले तर हाती काय लागेल? तर कायमची नफरत. कायमची तेढ,कायमची दुस्मानकी,याची परिणती ( रिझल्ट ) काय तर देशाची राष्ट्रीयता,अखंडता,एकता भंगनार.आणि देशाचे तुकडे तुकडे होणार.अनेक जातीचे अनेक धर्माचे प्रांत हेच देश म्हणून मिरावतिल,आणि स्वातंत्र्या आधी जसे येथील हिंदू राजे राजवाडे संस्थानिक आपापसात लढाया करीत आणि मदतीसाठी बाहेरच्या देशातील सम्राटांना बोलून त्यांचे मांडलिक बनून राहतील.या पेक्षा वेगळे काही घडेल असे मला वाटत नाही.असे होऊ द्यायचे नसेल तर,हिंदू मुस्लिम तेढ वाढविणारे प्रस्न न घेता हिंदूंना संघटित कसे करता येईल? आणि त्यांचे इतर धर्मियांशी कसे सलोख्याचे ,बंधुभाव चे संबंध दृढ होतील ? या साठी हिंदुवादी धर्मियांनी प्रयत्न केले पाहिजेत.अन्यथा हिंसेच्या, दादागिरीचे,सत्तेच्या,हुकूमशाही चे मार्गाने हिंदूंची सत्ता या 21 व्या शतकात,या भारतीय संविधानापुढे टिकणे शक्य नाही.स्वातंत्र्य नंतर भारतीय जनता ही हुशार झाली आहे.बहुजन समाजास शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा लाभलेला आहे,म्हणून सहजासहजी धर्माच्या आधारे आता सत्तेत कायम राहणे शक्य नाही..

         म्हणून बजरंग दलाने धर्मांधतेचा ,हिंसेचा मार्ग सोडावा,आणि हाच नव्हे तर कोणतेही प्रश्न अहिंसेच्या,लोकशाहीच्या,मार्गाने ,कायद्याच्या चौकटीत राहूनच प्रस्न सोडविणे हे त्यांचेच हिताचे ठरेल.कारण संविधानाने धर्माचे स्वातंत्र्य दिले आहे,त्याचा योग्य वापर करावा.दुरुपयोग करून एस मिळणार नाही.मिळाले तरी ते कायम टिकणारे नाही.शिवाय नफरतीची टांगती तलवार डोक्यावर कायमच असणार आहे.

         काही धार्मिक आणि राजकीय परंपरा पण आपणास शिकाऊन गेले आहेत,उदा.श्रीरामाने आपला शत्रू रावणाचा वध केला,तरी मरणानंतर खुद्द त्याचा सख्खा भाऊ त्यास अग्नी द्यायला तयार नव्हता तेंव्हा स्वतः श्रीरामाने अग्नी देण्याची तयारी दर्शविली,तेंव्हा बिभिषणाने रावणास अग्नी दिली,शिवाजी महाराजांनी मुस्लिम समाजाच्या सैन्यातील शिपयासाठी किल्ल्यावर नमाज पाडण्यासाठी मज्जिद बांधली,अफजलखानाची समाधी गडाच्या पायथ्याशी बांधली,हा इतिहास विसरता काम नये.

           पूर्वीच्या लढाया या सत्तेसाठी होत्या पण धर्माची सत्ता स्थापनेसाठी नव्हत्या,तर भूभाग जिंकण्यासाठी होत्या,हे विसरून चालणार नाही.तसे असते तर 300 वर्ष मुस्लिम राज्यात सर्वच हिंदूंची कत्तल झाली असती.इथे एकही हिंदू दिसला नसता, तरी पण जे धर्मांध राजे होते त्यांनी मात्र देवळे पाडली,हिंदू कापले.पण 300 वर्षातील फक्त बोटावर मोजण्या इतक्याच मुस्लिम धर्मांध राज्यांनी हिंसेचे कृत्य केले.सर्वांनी नाही,हे पण समजून घेतले पाहिजे.ते मोजके राजे पण सर्वच हिंदूंची कत्तल केले नाहीत ,,( हिटलर सारखे ) तर दहशत बसावी म्हणून मोजक्याच लोकांची कत्तल केली.हे पण समजून घ्यावे.पण काही झाले तरी राजकीय इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर समजते की,इतिहासातील लढाया या धार्मिक नव्हत्या,धर्मासाठी नव्हत्या,धर्माची सत्ता स्थापण्यासाठी नव्हत्या,तर त्या आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी,भूखंड जींकुन घेण्यासाठी होत्या. सरंजामशाही साठी ,साम्राज्याची होत्या.

         त्यामुळे दोन राजे मध्ये नाफरत असे,पण राज्यातील आम् जनतेत बंधुभाव असे.हे इथे नमूद केले पाहिजे.औरंगजेब एक शहांशहा होता,सम्राट होता,त्याने सारा उत्तर भारत जिंकला ,आणि आता दक्षिण भारत जिंकण्याच्या महत्वाकांक्षेने त्याने शिवाजी महाराजांशी युद्ध केले,पण तो त्यांना हराऊ शकला नाही.शेवटी तो इथेच स्वराज्याच्या भुमितच मेला.त्याची समाधी इथेच बांधली.तरी मराठा मावळ्यांनी समधीस विरोध केला नाही.कारण शत्रू असला तरी मरणोपरांत त्यास शातृत्वाच्या भावनेने वागू नये,शत्रू असला तरी त्याचे मातीला गेले पाहिजे,त्याने आपल्याशी चांगली लढाई केली,एका बहाद्दरने दुसऱ्या बहाद्दर शी उत्तम लढाई केली,म्हणून शत्रूच्याही पराक्रमाची तारीफ करण्याची परंपरा राजकीय इतिहासात आहे,ती उज्वल परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ नये.

        कारण जे उध्दात,उज्वल,पवित्र,मंगल,आदरणीय, विस्वसानिय,अनुकरणीय ,भविस्या घडविणारे आहे, बिघडवणारे नाही,ते आपण इतिहासातून घेतले पाहिजे,शिकले पाहिजे.कारण ” पुढच्यास ठेच मागचा शहाणा ‘ हा इतीहाचा धडा होय.

     आणि म्हणून,औरंगजेबाच्या समाधीचे राजकारण करू नये.वाकड्या मार्गाने सत्तेत न राहता सरळ सोप्या मार्गाने सत्ता सांभाळावी,अशी किमान अपेक्षा मी एक या देशाचा नागरिक,देशभक्त,अखिल मानवजाती च कल्याणकारी हितचिंतक म्हणून आपलाच बंधू म्हणून प्रदर्शनकारी युवकांना ,नागरिकांना विनंती करतो.

    लेखक : दत्ताभाऊ तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड

         दिनांक : २७ मार्च 2025.

                   फोन : 9420912209