
ऋग्वेद येवले
उपसंपादक
भंडारा : श्री.संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज विभागीय सेवा संस्था मौदा,जिल्हा नागपूरचे वतीने राजूभाऊ खवसकर साहित्यिक व अध्यक्ष यांचे नेतृत्वात तथा भंडारा गोंदियाचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे,माजी खासदार सुनील मेंढे यांचे प्रमुख उपस्थितीत विविध मागण्यांचे निवेदन भंडारा जिल्हा पालकमंत्री ना.संजय सावकारे यांना देण्यात आले.
एड.राहुल बावणे कार्याध्यक्ष,भंडारा भूषण रक्तरत्न प्रीतमकुमार राजाभोज,तुमसर येथील आयरन लेडी व समाजसेविका श्रीमती.मिरा भट्ट,विभागीय सचिव श्वेता शिंगाडे,कोषाध्यक्ष संगीता डहाके,भंडारा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे समाजसेवक सुरेश अवसरे,विदर्भ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शामराव पंचवटे,लाखनी पंचायत समितीचे माजी सभापती वसंता कुंभरे,आनंद ईश्वरदासजी सोनवाने साकोली तालुका अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले व ना.संजय सावकारे यांचा सत्कार करण्यात आला.
नामदार संजयजी सावकारे यांना खालील मागण्यांचे निवेदन देऊन समाजाच्या प्रति शासनाने उदारमत दाखवावे असे स्पष्ट करण्यात आले.
1) संत रविदासांचे साहित्य महाराष्ट्र शालेय व सांस्कृतिक पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याबाबत.
2) मुक्काम पोस्ट विरली,तालुका लाखांदूर,जिल्हा भंडारा येथील मृत चर्मकार समाजाच्या महिलेला न्याय मिळवून देण्याबाबत.
3) चर्मोद्योग विकास महामंडळातर्फे चर्मकारांना रोजगार मिळावा या संदर्भात तालुका व जिल्हास्तरीय स्तरावर मेळावे घेण्याबाबत.
4) गटाई कामगार व अन्य व्यावसायिकांना ग्रामपंचायत,नगरपंचायत, व नगरपरिषदेद्वारा गाडे उपलब्ध करून देण्याबाबत.
5) खाजगी कंपनीत १० वी,१२ वी, आयटीआय पात्र विद्यार्थ्यांना स्थायी नोकरी देण्याबाबत.
6) समाजातील महिलांचे सक्षमीकरण करण्याकरिता बचत गट व कौशल्य प्रशिक्षणात सामावून घेण्याबाबत.
याप्रसंगी भंडारा,नागपूर जिल्हा येथील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.यावेळी आनंद सोनवाने,हेमराज बावणे,सुरेखा शिंगाडे,पद्मा खवसकर,रणजीत शिंगाडे,गणराज डहाके,विरली येथील पिडित परिवार बनारसे हजर होते.