रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत घरकुलांना केव्हा मंजुरी मिळणार?

    उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

         युगप्रवर्तक-युगपुरुष-विश्वरत्न-विश्वभुषण-जगविख्यात प्रकांड पंडित-जगमान्य थोर समाजसुधारक-भारतिय संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमुर्ती-मातोश्री-स्त्रिभुषण रमाई आंबेडकर यांच्या नावाने,”रमाई आवास योजना, महाराष्ट्र शासनाने अमलात आणली.

           रमाई आवास योजना ही महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण मंत्रालयातंर्गत येतय.मात्र महाराष्ट्र राज्याचे समाजकल्याण विभाग खूपच निद्रिस्त अवस्थेत असून या विभागाला रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलांना मंजुरी देण्यास वेळ मिळत नसल्याचे दिसून येते आहे.

            जगप्रसिद्ध महापुरुषांच्या पत्नीच्या नावाने,” रमाई आवास योजना अंमलात आणून,”महाराष्ट्र शासनाने,” अनुसूचित जातीच्या घरकुल लाभार्थ्यांना,आधार युक्त महत्त्वपूर्ण दिलासा दिलाय.

        परंतु हा दिलासा वेळेवर आधार देणारा ठरत नसल्याने अनुसूचित जातीचे घरकुल लाभार्थी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागावर कमालीचे नाराज आहेत.

          पि.एम.आवास योजना आणि ठक्कर बाप्पा आवास योजनेला वेळेवर निधी उपलब्ध करुन दिला जात असेल तर महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाद्वारे रमाई आवास योजनेला वेळेवर निधी का म्हणून उपलब्ध करून दिल्या जात नाही? हे एक गंभीर कोडेच आहे.

        अनुसूचित जातीच्या घरकुल लाभार्थ्यांना ताटकळत ठेवणे आणि त्यांची दिरंगाई अन्वये अवहेलना करणे कितपत योग्य आहे?

           महाराष्ट्र शासन आणि त्यांच्या अंतर्गत येणारे समाजकल्याण विभाग अनुसूचित जातीच्या घरकुल लाभार्थ्यांना रमाई आंबेडकर आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करुन केव्हा दिलासा देणारा? हा मार्मिक प्रश्न घरकुल लाभार्थ्यांचा महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाला आहे…