
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर :- गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वातंत्र्यवीर वि.दा सावरकर यांच्या ६० व्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान व मरणोत्तर नेत्रदान संकल्प एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गांधी सेवा शिक्षण समितीचे कोषाध्यक्ष प्रा.मारोतराव भोयर होते.त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी समाजात जाऊन नेत्रदान व रक्तदानाची जनजागृती केली पाहिजे.
प्रमुख वक्ते प्रा. डॉ. दिनकर चौधरी होते त्यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना म्हटले की,स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगा जगण्याचा मूलमंत्र रक्तदान व नेत्रदान संकल्प असला पाहिजे.प्रत्येक रासेयो स्वयंसेवकानी रक्तदान व नेत्रदानाचा संकल्प केला पाहिजे आणि हा संकल्प म्हणजे राष्ट्रगीताचे कार्य करणे होय.समाजात जाऊन प्रचार प्रसार करावाअसे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला उपस्थित प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपल्या भारतात अवयवदान व नेत्रदान जनजागृती फार कमी आहे. ही चळवळ झाली पाहीजे. प्रत्येकानी अवयवदानाचा संकल्प करायला हवा.
कार्यक्रमाला गांधी सेवा शिक्षण समिती सचिव प्रा. विनायकरावजी कापसे, सहसचिव कुंदनजी बारापात्रे होते. प्रस्तावना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रफुल राजुरवाडे सूत्रसंचालन डॉ.नितीन कत्रोजवार, आभार प्रा.निलिमा तुराणकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. डॉ. राहांगडाले प्रा.डॉ कामडी प्रा. आशुतोष पोपटे प्रा. रोशन कुमरे प्रा. गुणवंत वाघमारे उपस्थित होते. कार्यशाळेला रासेयो विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.