
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुकातंर्गत पावसाळ्यात पडलेल्या घरांचे पंचनामे करून शासन आणि प्रशासन स्तरावर अहवाल तलाठ्यांकडून सादर करण्यात आले.
मात्र अजूनही पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पडलेल्या घरांच्या संबंधाने सहानुग्रह आर्थिक मदत संबंधितांना शासन-प्रशासन स्तरावरुन देण्यात आली नाही.
यामुळे चंद्रपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अतिवृष्टीमुळे पडलेल्या घरांच्या संबंधाने सहानुग्रह आर्थिक मदत देण्यासंबंधाने अतिशिघ्र लक्ष केंद्रित करावे अशी मागणी पळसगाव पिपर्डा ग्रामपंचायतचे सदस्य हपिजभाई शेख यांनी केली आहे.
गोरगरिबांच्या घर पडझड प्रकरणाकडे शासन-प्रशासन उशिरा लक्ष केंद्रित करतय हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न सुध्दा हपिजभाई शेख यांनी केला आहे…