शंकर पटनिमित्ताने संगीत मृत्यूदंड या नाटकाचे मोफत आयोजन… 

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : खास बैलांच्या शंकर पटनिमित्ताने युवा संकल्प नाट्य कला संच एकोडीच्या वतीने दिनांक २८/२/२०२५ ला खास लोकांच्या आग्रहास्तव श्रीकांत तुमसरे यांच्या लेखणीतून साकार झालेली तीन अंकी नाट्य पुष्प संगीत मृत्यूदंड या नाटकाचे रात्री ९ वाजता मोफत आयोजन करण्यात आले आहे.

      तसेच सायंकाळी ७ वाजता पासून मराठमोळी लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

       त्या नाटकामध्ये नावाजलेले सिने अभिनेता, प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी, अभिनय सम्राज्ञी व जेष्ठ कलावन्त आपली भूमिका सादर करणार आहेत.

        तरी परिसरातील सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान भावेश कोटांगले ,मनोज कोटांगले, सुकराम बन्सोड, कैलास जांभूळकर, सुखराम जांभूळकर, प्रशांत लांजेवार, लीलाधर बावणे,राजकुमार मेश्राम,राजकुमार भुरे, नेमीचंद भुरे, विलास गिर्हेपुजे, छत्रपती भुरे, तिर्थानंद बोरकर यांनी केले.