प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे यांच्या ५० व्या जन्मदिनाचे औचित्य साधून १५ फेब्रुवारी रोजी संजय गांधी निराधार योजना महामेळावा आयोजित करण्यात आला. या महामेळाव्यात जवळपास हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित राहून महामेळाव्याचा लाभ घेतला.
राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सामाजिक व राजकीय माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे केली त्यामुळे सुधीरभाऊंनी २००२ पासून त्यांच्या हाती राजकीय सूत्र दिली. सुधीर भाऊंच्या नेतृत्वात जनतेनी त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून सन २००२ ते २०२२ पर्यंत नकोडा – शेणगाव क्षेत्रातून पंचायत समिती सदस्य ते सभापती पासून जिल्हा परिषद सदस्य ते सभापती पर्यंतचा पदभार स्वीकारून लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली या कालावधीत त्यांनी गरीब, निराधार व अपंग, तळागाळातील व्यक्ती करिता अनेक महत्वकांक्षी कामे केली.
गरीब, अपंग,तळागाळातील व्यक्ती बद्दल त्यांचे मनात असलेली कणव पाहून सुधीरभाऊंनी जुलै २०२३ मध्ये संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती दिली. या सहा महिन्याच्या कालावधीत १०८१ नागरिकांना संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निराधार योजना व विशेष अर्थसहाय्य योजने अंतर्गत नागरिकांना लाभ मिळवून दिले. त्यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संजय गांधी निराधार योजने अंतर्गत आवेदन करणाऱ्या लाभार्थ्यांना सर्व मोफत सुविधा उपलब्ध करून या योजनेचा लाभ मिळवून देण्यात येत आहे.
यावेळी आयोजित महामेळाव्यात माजी जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी म्हटले की, अतिशय तळागाळातून काम करीत असतांनाच उत्तम अस उदाहरण म्हणजे सामाजिक बिर्जेतून राजकारण करणाऱ्यांचे जे काही उत्तम उदाहरण असेल ते म्हणजे ब्रिजभूषण पाझारे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून निराधारांची सेवा केली.
आज त्यांची ओळख निराधारांचा आधार म्हणून चंद्रपूर महानगरात आहे. भारतीय जनता पक्षाचे महामंत्री म्हणून विशेष करून पक्षाचे काम केले अश्या या समाजकारणी राजकारण्याला माझ्यातर्फे अनंत कोटी मंगलमय शुभेच्छा.
तसेच महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार यांनी यावेळी संबोधले की, ब्रिजभूषण पाझारे यांनी तळागाळातून काम करीत स्वतःच्या मेहनतीने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आज या पदावर पोहोचले त्यांची काम करण्याची शैली अनोखी आहे ते एखादे काम करण्याचे ठाम केले की ते पूर्ण होईस्तोवर सतत पाठपुरावा करीत असतात. आणि आज त्यांची ओळख निराधारांचा आधार म्हणून चंद्रपूर महानगरात आहे. त्यांच्या प्रत्येक वाटेवर यश येवो असे बोलून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर शुभेच्छा देतांना कार्यकर्ता, पदाधिकारी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे ब्रिजभूषण पाझारे. तळागाळातील लोकांपर्यंत जावून प्रत्येक योजना पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी तडफड करणारा नेता मी त्यांच्यामध्ये पाहिला आहे.
त्यांची काम करण्याची शैली आणि आज त्यांची निराधारांचा आधार म्हणून ओळख आहे. त्यांचे करिता माता महाकाली चरणी प्रार्थना करतो व त्यांना उत्तम आरोग्य लाभो. येणाऱ्या काळात एक उत्तम नेता म्हणून आमच्या समोर यावे अशी माता महाकाली चरणी प्रार्थना करतो व वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो.त्यानंतर या महामेळाव्यात उपस्थितांना संबोधतांना पाझारे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांचे सर्वप्रथम सर्वांचे आभार मानले.
तसेच त्यांनी चंद्रपूर महानगरातील प्रत्येक वार्डातील अगदी तळागाळातील निराधार, अपंग, विधवा तसेच वयोवृद्ध म्हणजेच संजय गांधी निराधार योजनेच्या निकषात येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प केले. त्यानंतर उपस्थित सर्व नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांचेशी चर्चा केली तसेच यावेळी 341 लाभार्थ्यांना मंजूर प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
या महामेळाव्यात माजी जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार, रविंद्र गुरनुले, भाजयुमो अध्यक्ष विशाल निंबाळकर, जिल्हाध्यक्ष अनु. जमाती धनराज कोवे, जिल्हाध्यक्ष अनु. जाती धम्मप्रकाश भस्मे, ज्योती कुचनकर तहसीलदार सं. गां. नि. समिती चंद्रपूर, मंडळ अध्यक्ष रवि लोणकर, दिपक भट्टाचार्य, तसेच संजय गांधी निराधार समिती पदाधिकारी सौ. अर्चना मानलवार, प्रवीण उरकुडे, निलेश पाझारे, अशोक संगीडवार, श्रीराम पान्हेरकर, सौ. सारिका संदूरकर, दिवाकर पुद्दटवार, अजय सरकार, सचिन कोतपल्लीवार तसेच भारतीय जनता पक्ष चंद्रपूर महानगराचे युवामोर्चा, व्यापारी आघाडी तसेच महामेळाव्याकरिता उपस्थित लाभार्थी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.