युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर नगरपालिका क्षेत्रातील सैनिक कॉलनी मुख्य रस्त्याची दुर्दशा झाल्याने अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. कित्येक वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडल्यामुळे रहिवाशी नागरिकांना व वयोवृद्ध, शाळकरी विद्यार्थ्यांना खड्डेमय रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर पाणी साचत असल्यामुळे रोगराईची मोठी समस्या उदभवत असते.
तसेच या परिसरात पक्क्या नाल्या ( गटारी ) नाहीत. मात्र नगर पालीका प्रशासनाचे दुलँक्षच होत असल्याने संतप्त माजी सैनीकांनी थेट नगरपालीकेसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनास शिवसेना, युवासेनेने पाठिंबा देत आंदोलनकारी माजी सैनिकांना न्याय देण्यात मदत करण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी युवा सेनेचे अंकुश कवडकर, बबन विल्हेकर,दीपक बागडे तथा युवा सेनेचे पदाधिकऱ्यांनी पलिका मुख्याधिकारी यांना जाब विचारला,
दर्यापूरातील सैनिक कॉलनी या परीसरामध्ये मोठ्या प्रमाणात आजी-माजी सैनिक हे कुटुंबासह वास्तव्यात आहे. मात्र मुलभूत सोयी सुविधा प्रशासनाकडून मिळत नाही. ही अतिशय खेदजनक व दुर्दैवी वास्तव चित्र आहे. विशेष म्हणजे माजी सैनिकांच्या वतीने समस्याबाबत अनेकदा तक्रारी व निवेदने नगरपालिका प्रशासनाला दिली आहेत.
मात्र ‘समस्या जैसे तेच’ असल्याने बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी प्रामुख्याने हितकारी माजी सैनीक संघटनेचे अध्यक्ष कँप्टन अँड.भाऊराव तायडे,रेखाराज सिंग,ललिता गौतम गवई,विनोद सरदार,भारत चौरपगार व परिसरातील शेकडो पुरुष-महीलांनी हिरहिरीने सहभाग घेत पाठिंबा दिला आहे.
प्रतिक्रिया
गेल्या अनेक दिवसापासून सैनिक कॉलनी परिसरात विकास कामे झाली नाहीत, रस्ते अतिशय खराब आहेत, नाल्या नाहीत, गटार झाले आहे आरोग्याला धोका झाला आहे. मात्र प्रशासन लक्ष देत नाही, आता कामे झाल्या शिवाय माघार नाही आम्ही आमरण उपोषण करीत आहोत.
डॉ. भाऊराव तायडे उपोषण कर्ते
सैनिक कॉलनीत नागरिकांनी मागणी केल्यानंतर ही प्रशासन लक्ष देत नाही, यामुळे उपोषण करावे लागत आहे निधी आल्यानंतर सुद्धा इतर ठिकाणी वळविण्यात येतो. राजकीय दाबवाला प्रशासन बळी पडले आहे आता युवासेना व शिवसेनेच्या माध्यमातून या आंदोलनाला आम्ही बळ देणार आहोत.
अंकुश कावडकर
युवासेना जिल्हा प्रमुख
प्रशासनाने या उपोषणाची वेळीच दखल घेण्यात यावी अन्यथा आक्रमण संघटनेच्या वतीने नगरपरिषद कार्यालयावरती तीव्र स्वरूपात आंदोलन छळण्यात येणार आहे.