कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवणी
पारशिवनी : -पारशिवनी तालुक्यातील पारशिवनी पोलिस स्टेशन च्या हदीतील इटगाव शिवारातील कॅनल जवळ रोड च्या बाजुला कुणीतरी अज्ञात कारणावरून त्याच्या डोक्यावर धारदार हत्याराने मारून गंभीर जख्मी करून जिवानिशी ठार करून हत्या केल्याने पारशिवनी पो स्टे येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
रविवार (दि.२५) फेब्रुवारी ला सायंकाळी ८ वाजता दरम्यान श्री पुरुषोत्तम विठोबाजी नागपुरे वय ६१ वर्ष रा. रोहणा ता. सावनेर जि.नागपुर व पत्नी घरी असताना त्यांचा मुलगा सचिन नागपुरे हा घरी आला. तेवढयातच सचिन पुरुषोत्तम नागपुरे वय ३२ वर्ष रा रोहणा याचे मोबाईलवर कोणाचातरी फोन आल्याने सचिन आपली मोटार सायकल क्रमांक एम एच ४० एए ५५७३ घेवुन थोडया वेळात घरी परत येतो असे सागुन घरून गेला.
अंदाजे ९.१५ वाजता वडिलांचा चुलत भाऊ खुशाल नागपुरे यांनी माहीती दिली की, गावातील पंकज बहरुपी याने फोन करुन सांगितले की, तुमचा पुतन्या सचिन नागपूरे हा कन्हान नदीचे पुलाकडे इटगाव शिवारातील कॅनल जवळ रोडच्या बाजुला जख्मी अवस्थेत पडलेला असुन त्याचे डोक्या ला मार लागलेला आहे. व त्याची मोटार सायकल रोड वर काही अंतरावर पडलेली आहे. त्याला त्याचे मित्रा नी सरकारी दवाखाना पारशिवनी येथे उपचारासाठी नेले आहे.
अशा माहितीने वडिल व त्यांची पत्नी सौ. सुमन नागपुरे दोघेही सरकारी दवाखानात गेले असता मुलगा सचिन नागपुरे याचे डोक्याला मागील भागास कोणत्यातरी धारदार हत्याराने वार केल्याने जबर दुखापत होवुन रक्त निघत असल्याचे दिसले. तसेच मुलाचे उजव्या हाताचे पंजाला मुका मार लागुन हात सुजलेला दिसुन आला. माझे मुलास डॉक्टरानी तपासुन मरण पावल्याचे सांगितल्याने फिर्यादी वडिलांनी पारशिवनी पोस्टे ला रात्री ८ ते ९ वाजता दरम्यान इटगाव शिवारातील पाईप लाईन रोड ने मोटार सायकलने कोठेतरी जात असतांना त्यास कोणीतरी अज्ञात इसमाने डोक्याचे मागील भागास व डोक्यावर कोणत्यातरी धारदार हत्याराने वार करुन गंभीर जख्मी करुन जिवानिशी ठार केले. अश्या तक्रारीवरून पारशिवनी पोलीसानी अज्ञात इसमा विरूध्द अप.क. ७०/२०२४ कलम ३०२ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पोउपनि शिवाजी भताने व डि बी पथक पो.स्टे. पारशिवनी पुढील तपास करित आहे.
घटना स्थळी नागपुर ग्रामिण पुलिस अधिक्षक हर्ष पोदार, रामटेक उपविभागिय पोलिस अधिकारी रमेश बरकते , पोलिस निरिक्षक पारशिवनी राहुल सोनवने, पो उप नि शिवाजी भताने, पो उप नि राजेश पिसे डि बी पथकाचे विरेन्द चौधरी पो हवा राकेश बधाते पो हवा पृथ्वीराज चौहान सह कर्मचारी घटनस्थली भेट देऊन हजर होते .