रांगीत दुचाकी वाहनाने रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या उभ्या बंड्डीला दिली धडक.. — एक तरुण ठार तर दुसरा जखमी..

प्रा.भाविकदास करमनकर 

   तालुका प्रतिनिधी धानोरा..

        धानोरा तालुक्यातील रांगी बायपास रोडवर ताडाम यांच्या समोर रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या बंड्डीला दुचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार तर दुसरा तरुण जखमी झाल्याची घटना आज दिनांक सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.

         सविस्तर वृत्त असे की,प्राप्त माहितीनुसार दुचाकी वाहन क्रमांकाची MH.3, AF. 7338 ची दुचाकी गाडी बायपास रोडने प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मानाणापुरला जात असल्याचे कळते.

        मात्र,संदिप ताडाम यांच्या घरासमोर रस्त्याच्या कडेला रिकामी बंड्डी ठेवली होती.

       वाहन चालक बोरुले यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बैल गाडीला जोरदार धडक दिली.त्यात दुचाकी वाहन चालक खट्या बोरुले वय अंदाजे 35 वर्ष (मानापुर) जागीच ठार झाला तर दुसरा राजु ठाकरे वय अंदाजे 32 वर्ष (मानापुर) गंभिर जखमी झालेला असुन त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र रांगी येथे भरती करन्यात आले.

        त्यानंतर जखमीला गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याचे कळते.