दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

 

      पुणे : दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांच्या काल रात्री सीबीआयने केलेल्या सुडात्मक अटकेविरोधात आज पुण्यात बालगंधर्व चौक येथे झाशीच्या राणी पुतळ्यासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. 

 

“दिल्लीत शिक्षण क्रांती घडवून आणण्यात आप नेते व शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांचा सिंहाचा वाटा आहे. दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये घडलेले अभूतपूर्व बदल हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरलेला आहे. सरकारी शाळांचा कायापालट करुन आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना बदनाम करण्यासाठी भाजपच्या केंद्र सरकारने मोठी मोहीम चालवली होती. सिसोदिया यांची अटक म्हणजे इडी, सीबीआय द्वारे केंद्र सरकारने चालवलेली दडपशाही आहे”, अशी प्रतिक्रिया विजय कुंभार, आप राज्य संघटक यांनी दिली. 

 

आरोग्य व शिक्षण क्षेत्रात आम आदमी पार्टीने केलेल्या कामांची दखल देशातील जनतेने घेतली असून केवळ दहा वर्षात आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष म्हणून नावारूपाला आला आहे. जनतेचा प्रचंड प्रतिसाद आम आदमी पार्टीला भेटत आहे. त्यामुळे भाजप चिंताग्रस्त झाला आहे. भाजपला आरोग्य, शिक्षण क्षेत्रात कधीच भरीव कामगिरी करता न आल्याने आकसाने आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील आरोग्य मंत्री, शिक्षण मंत्री व इतर नेत्यांवर सुडात्मक कारवाई केली जात आहे. त्यासाठी खोटे आरोप करुन इडी, सीबीआय यासारख्या यंत्रणांचा गैरवापर करत आपच्या नेत्यांना अटकेत टाकत आहे. मनीष सिसोदिया यांच्यावर लावलेले आरोप खोटे असून केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात आम आदमी पार्टी संविधानिक मार्गाने जोरदार लढाई लढेल.

 

यावेळी आप राज्य संघटक विजय कुंभार, पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत,वाहतूक विंग राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य, आनंद अंकुश, सुजीत अग्रवाल, प्रभाकर कोंढाळकर, मीरा बीघे, सीमा गुट्टे, वैशाली डोंगरे, किरण कद्रे, किशोर मुजुमदार, घनश्याम मारणे, किरण कांबळे, शेखर ढगे, मनोज शेट्टी, अमोल काळे, राजू परदेशी, सहील परदेशी, फेबियन सॅमसन, किर्तीसिंग चौधरी, सतीश यादव, योगेश इंगळे, धनंजय बेनकर, मनोज फुलावरे, अनिल धुमाळ, निरंजन अडगले, रोहन रोकडे, आबासाहेब कांबळे, अनिल कोंढाळकर, सर्फराज मोमीन, संजय कोणे, ललिता गायकवाड, ऋषिकेश मारणे, सुरेखा भोसले, रामभाऊ इंगळे, अंजली इंगळे, शंकर पोटघन, सुभाष कारंडे, अमोल मोरे, निखिल देवकर, आसिफ खान, समीर अरवाडे, सुनील वाल्हेकर, रमेश मते , शिवाजी डोलारे, संजय कटारनवरे, चंद्रकांत गायकवाड, तानाजी शेरखाने, प्रीती नीकाळजे, बीघे, बापू रणसिंग, श्रद्धा शेट्टी, मिताली वडवराव, मिलिंद ओव्हाळ, मनोज एरंडकर व अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com