लोकनेते कै.महादेवराव बोडके दादा विद्यालयामध्ये “प्रजासत्ताक दिन” विविध सांस्कृतिक कलागुणाच्या उपक्रमाने साजरा!…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

पिंपरी बुद्रुक ते नरसिंहपुर परिसरातील लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालय पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर यथे 26 जानेवारी 2025 “हा प्रजासत्ताक दिन” विविध सांस्कृतिक कलागुणाच्या उपक्रमाने साजरा करण्यात आला.

         विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत कोरटकर सर सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे आयोजन करण्यात आले होते. 

         “प्रजासत्ताक दिनानिमित्त लालासो बोडके यांच्या हस्ते “ध्वजारोहण ” करण्यात आले.तसेच पिंपरी ग्रामपंचायतच्या कार्यालया समोर सरपंच भाग्यश्री बोडके व संस्थापक अध्यक्ष सुभद्राताई बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

         ध्वजाचे पूजन रामचंद्र लावंड यांच्या हस्ते करण्यात आले,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर बबन दादा बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तलाठी कार्यालयासमोर सुनील बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

          प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पांडुरंग बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर सुतार वस्ती येथे भारत सुतार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी कैलासवासी लोकनेते महादेवराव बोडके दादा यांच्या प्रतिमेचे पूजन बाळासाहेब मगर यांच्या हस्ते करण्यात आले.

                पिंपरी बुद्रुक ते नरसिंहपुर परिसरामध्ये गिरवी, गोंदी, तनु, अडोबा वस्ती, लुमेवाडी, चव्हाण वस्ती, सुतार वस्ती, ओझरे,गणेश वाडी,सराटी,गोंदी, आधी सर्व परिसरा मधील सर्व ग्रामपंचायत कार्यालया, व विद्यालयासमोर विविध उपक्रम व शालेय संस्कृती कार्यक्रमाने उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले.

             यावेळी संस्थापक अध्यक्ष सुभद्राबाई महादेव बोडके, समाधान बोडके,सरपंच भाग्यश्री बोडके,सरपंच प्रतिनिधी सुदर्शन बोडके,उपसरपंच संतोष सुतार, बबनदादा बोडके लालासाहेब बोडके,सुनील बोडके, रामभाऊ लावंड, पांडूदादा बोडके ,वर्धमान बोडके, तुकाराम मगर, बाळासाहेब घाडगे, दत्तूनाना बोडके,राहुल शिंदे, दादाभाई शेख, शिवाजी बोडके,हरिभाऊ सुतार, नबीलाल शेख ,कल्याण बोडके,श्याम पडळकर,बाळासाहेब मगर, सह प्रमुख ग्रामस्थ व शिक्षक शिक्षिका,आरोग्य अधिकारी अशा सेविका, इतर सर्व कर्मचारीवर्ग आणि ग्रामपंचायत कर्मचारी शंकर रणदिवे, मयूर सुतार,सह तरुण मित्र व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थिती होती.

          यावेळी विद्यालयाच्या संस्थापक अध्यक्ष सुभद्राताई बोडके या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.”ध्वजारोहण” नंतर विविध उपक्रम राबविण्यात आले.

     यामध्ये “खडी कवायत” “बैठे कवायत” प्रकार घेण्यात आले .तसेच विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यानी “प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.

      जिल्हा परिषद शाळा व लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयातील विद्यार्थी यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कला कार्यक्रम करण्यात आला. 

             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे काम आबासाहेब बोडके सर व पोळ सर यांनी केले.

          संपूर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत कोरटकर सर यांनी मानले.