जेएसपीएम महाविद्यालयात प्राचार्यच्या हस्ते ध्वजारोहण..

भाविकदास करमनकर 

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

 स्थानिक :- धानोरा येथील जे एस पी एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय थुल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

         यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.

           त्याचे बक्षीस वितरण महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. उदय थुल यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख गीताचंद्र भैसारे मॅडम शारीरिक शिक्षण क्रीडा प्रमुख डॉ. संजय मुरकुटे उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉ.गणेश चुधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक ज्ञानेश बनसोड यांनी केले.

           यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.