युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शनिवार दि. 25 जानेवारी रोजी संविधान बचाव देश बचाव कार्यक्रम चंडिकापूर येथे बाजार चौकात घेण्यात आला आहे.
कार्यक्रमाला शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व गावातील कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमात भारत मातेचे फोटोचे पूजन व संविधानाचे वाचन करून फोटोची पूजा माजी पंचायत समिती सदस्य तुळशीदासजी स्वर्गे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद धनोकार माजी युवा सेना जिल्हाप्रमुख तथा ग्रामपंचायत उपसरपंच चंडिकापूर यांनी केले.
कार्यक्रमाकरिता ग्रामपंचायत सदस्य दर्शन चौरपगार, एजाज भाई,हरीश कावरे,उमाळे,निलेश इंगोले इत्यादी सर्व शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.