
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
पळसगाव (पि )ताडोबा बफर झोन अंतर्गत चिमूर जवळ वसलेले ताडोबा टायगर हॉलिडे हे महिलाशक्तीचा उत्कट प्रेरणादायी प्रवास आहे. ७२ वर्षीय,या रिसॉर्टच्या प्रेरणादायी मालकिन आहेत.ज्यांनी आपल्या धाडसी नेतृत्वाने आणि दृढ निश्चयाने महिलांना रोजगाराची संधी दिली आहे.
जंगल सफारीची प्रमुख जबाबदाऱ्या त्यांच्या सुनेने, अत्यंत कुशलतेने सांभाळल्या आहेत. याठिकाणी ७५% पेक्षा जास्त कर्मचारी महिला आहेत, ज्यामुळे हे रिसॉर्ट महिलांसाठी सुरक्षिततेचा आणि आत्मीयतेचा अभूतपूर्व अनुभव देतं.
२५ जानेवारी २०२५ महिलांच्या जंगल सफारीचे खास पर्व घेऊन नागपूरमधील ५० अधिक महिलांच्या गटाने या रिसॉर्टला भेट दिली, ज्याने ताडोबाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या मोठ्या गटाला सामावून घेतलं आणि त्यांच्या जंगल सफारीचा रोमांच अनुभवला.
त्यांनी पांगीडी, पळसगाव, आणि मदनापूर गेट, ताडोबा या जंगल सफारीमध्ये भाग घेतला, जिथे त्यांना वाघांचे रोमांचक दर्शन झाले.
ताडोबाच्या जंगलाच्या गूढ शांततेत वाघांचे दर्शन घेणं आयुष्यभरासाठी अविस्मरणीय ठरलं.रिसॉर्टच्या आदरातिथ्याने आम्हाला घरचं वातावरण दिलं असे या गटातील महिलांनी आनंदाने सांगितलं.
सुरक्षित आणि आरामदायक निवासः महिलांच्या नेतृत्वाखाली असलेले सुरक्षित वातावरण, खासकरून महिलांसाठी रोमांचक जंगल सफारी अनुभवः वाघ, हरीण, आणि पक्ष्यांचे दर्शन घेण्याचा अविस्मरणीय अनुभव..
स्थानिक महिलांसाठी रोजगार आणि स्वावलंबनाची संधीः स्थानिक महिलांना रोजगार देत, त्यांचं आयुष्य समृद्ध करणारा अनोखा उपक्रम.
ताडोबाच्या जंगलातील रोमांच अनुभवा आणि महिलांच्या सशक्त प्रवासाचा अभिमान वाटवा. प्रत्येक मुक्काम तुम्हाला निसर्गाच्या जवळ नेईल आणि महिलाशक्तीच्या अद्वितीयतेचा अनुभव देईल.”