उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत सत्तेच्या माजात मुरुम उत्खनना अंतर्गत खरबो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे मत पत्रकार तथा नरवडे ग्लोबल हुमन राईट्सचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रदीप रामटेके यांचे आहे.
यामुळे सदर अवैध मुरुम उत्खननातंर्गत भ्रष्टाचार प्रकरणाची पोलखोल करणार असल्याची चिन्हे आहेत.
मागील १० वर्षांपासून चिमूर विधानसभा मतदारसंघात मुरुमाचे होणारे उत्खनन लिज पेक्षा शंभर पटीने जास्त करण्यात आले आहे.
तद्वतच महाराष्ट्र सरकारच्या महशुल विभागाने काही नागरिकांना पट्टातंर्गत उपजिविकेसाठी दिलेल्या जमिनी मधून सुद्धा मुरुमांचे नियमबाह्य उत्खन करण्यात आल्याने सदर शेतजमिनी पडीक झालेल्या आहेत.
मागील १० वर्षात मुरुमांचे अवैध उत्खनन करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी अवैध मुरुम उत्खननाकडे अजिबात लक्ष दिले नव्हते,हे वास्तवच आहे.