सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधि
म.रा. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ मूल व महिला शाखा सावली- मूल च्या संयुक्त विद्यमाने संघटनेचा “स्नेहमिलन” सोहळा ‘शिवार फार्म’ चितेगाव येथे जिल्हाध्यक्ष अरुण खराते यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा महासचिव जगदीप दुधे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
भद्रावती,सिंदेवाही व चंद्रपूर येथील पतसंस्थांच्या नवनिर्वाचित संचालकांचा परिचय व सत्कार करण्यात आला. बहुजन हिताय- बहुजन सुखाय मागासवर्गीय कर्मचारी पतसंस्था चंद्रपूर येथील नवनिर्वाचित संचालक प्रशांत काटकर, अजित साव, गणपत चव्हाण, सुनीता टिपले यांनी कल्याण महासंघात जाहीर प्रवेश घेतला.
सदर कार्यक्रमात पुढील विषयावर चर्चा करण्यात आली.
1) सावली, मुल येथील पतसंस्थेच्या निवडणुकीबाबत चर्चा.
2) जिल्हाभरात संघटनेचे 20 च्या वर संचालक निवडून आले, त्यांचे अभिनंदन ठराव व संघटना वाढीवर चर्चा
3) चंद्रपूर,राजुरा, कोरपना जिवती, गडचांदूर येथील शाखा निर्माण करण्यावर चर्चा.
सदर कार्यक्रमास जिल्हा कोषाध्यक्ष व भद्रावतीचे संचालक शंकर मसराम, सिंदेवाही चे संचालक प्रशांत खोब्रागडे, बहुजन हिताय – बहुजन सुखाय पतसंस्थेचे संचालक संजीवनी खोब्रागडे, सुनीता टिपले, प्यारेलाल गेडाम , गणपत चौव्हान, नंदाजी कोवे, प्रशांत काटकर, अजित साव, जगदीप दुधे, सुनील निमगडे उपस्थित होते. ब्रह्मपुरी चे राजकुमार पाटील, प्रशांत घुटके व भद्रावती चे प्रवीण थेरकर,निखिल ठमके हे कौटुंबिक कामामुळे कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मूल चे महासचिव सुनील निमगडे, सावलीचे अध्यक्ष संदेश मानकर, महासचिव मा.संतोष सिडाम, आकाश कुकुडकर, प्रकाश निमगडे, टीकोबुद्धदास वाळके, रत्नमाला गेडाम, महिला शाखेच्या अध्यक्ष विद्या कोसे, ज्योती सूर्यवंशी, संगीता निमसरकार, चंदा तुरे, रतीशा रामटेके, शिला गेडाम, सुवार्ता जीवणे, राजश्री कुकुडकर, आदेश मानकर, डॅनियल देवगडे, अशोक गावंडे, सचिन रामटेके, किशोर लाडे, बाबाराव मेश्राम, विवेक दुधे, सुनील खंडाळे, उत्तम गोवर्धन, गोविंदा सोनटक्के, आतिष उराडे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता रुचकर भोजनाने करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन विद्या कोसे, प्रास्ताविक संदेश मानकर तर आभार प्रदर्शन सुनील निमगडे यांनी केले.