युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- गंगोत्री बहूउद्देशिय ग्रामिण शिक्षण द्वारा, संचालित असलेल्या डायमंड इंग्लिश स्कुल, चंद्रपूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे उत्कृष्ट सादरीकरण करुन सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
कोरोना काळात बंद पडलेला सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा या वर्षी प्रथमच ग्रा.पं.खल्लारने आयोजित केल्या होत्या.या स्पर्धेमध्ये गावातील बऱ्याचशा शाळेने सहभाग घेतला होता.डायमंड इंग्लिश प्रायमरी स्कूल चंद्रपूर ने”संघर्ष स्त्री जीवनाचा”या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन आपल्या कलेचे उत्कृष्ट सादरीकरण करुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
स्पर्धेचा निकाल जाहीर होताच शाळेच्या विध्यार्थ्यांनी डिजेच्या तालावर ठेका धरला.प्रथम क्रमांकाचे बक्षिस खल्लारचे सरपंच आरिफ शहा युनूस शहा व माजी सरपंच योगेश पाटील मोपारी यांचे हस्ते देण्यात आले.
यावेळी खल्लार बाजार चौकात पंचक्रोशीतील लोक कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते.संघर्ष स्त्री जीवनाचा या नृत्यासाठी सौ.जया बावणे स.शि.कु.नयना इंगळे स.शि.कु.प्रगती तायडे स.शि.सौ.प्रियंका तायडे स.शि.कु.अपुर्वा लोखंडे यांनी सौ.निकीता निंबाळकर मुख्याध्यापिका यांच्या सहकार्याने परिश्रम घेतले.