सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधि
परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाथरी नगरी मध्ये 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पाथरी नगरितील मुख्य चौकात गुणवंत विदयार्थी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन आगळा – वेगळा साजरा केला असता परिसरातील तथा नगरीतील जनतेनी आयोजन करणाऱ्या ग्रामपंचायतचे कौतुक केले.
सावली तालुक्यातील मौजा पाथरी नगरी हे परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी इंग्रज कालीन आसोला मेंढा तलाव, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पोलीस स्टेशन, पोस्ट कार्यालय, पाटबंधारे विभाग वनविभाग, अशे अनेक कार्यालय इंग्रजी राजवटीत इंग्रजानी निर्माण केले, आणि ती जोपासना अनेक वर्षा पासून पाथरी वासिय जनता करत आहे.
ही नगरी या परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असून या नगरिशी परिसरातील जवळ पास तीस ते पस्तीस गावांचा रोज आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी संपर्क येतो आणि या नगरीत सर्व तो परी नागरिकांना आवश्यक असलेल्या भौतिक सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत,75 व्या प्रजासत्ताक दिनाचे आणि पाथरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ज्याची स्थापना सन 1924 ला झाली असून या वर्षी 100 वर्ष पूर्ण झाले असता शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
सकाळी सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालय या ठिकाणी सकाळ पासून ध्वजारोहन सोहळा संपन्न करून आणि विशेष या सोहळ्या प्रसंगी गुणवंत विद्यार्थी यांच्या हस्ते प्रमुख चौकात ध्वजारोहण करून एक आगळा – वेगळा सोहळा साजरा केला त्या नंतर पोलीस स्टेशन पाथरी येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
तसेच या ठिकाणी स्वर्गीय स्नेहल उत्तमराव वानखडे व स्वर्गीय मास्टर नरेंद्र मेश्राम यांच्या स्मुर्ती प्रीत्यर्थ आधुनिक देशात स्व रक्षणासाठी नित्यान्त गरज असलेले कराटे प्रात्यक्षिक सुद्धा दाखविण्यात आले, सदर ठिकाणी बिस्कीट खाऊ चे सुद्धा वितरण करण्यात आले. संध्याकाळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाथरी येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम बघण्यासाठी पाथरी नगरितील जनता मोठ्या प्रमाणात येऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्या करिता पाथरी येथील ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस स्टेशन पाथरी व संपूर्ण कार्यालय तथा जनतेनी सहकार्य केले. तथा आय सी सी क्रिडा मंडळ तथा अनेक संस्था व नागरिकांनी आर्थिक योगदान देऊन शाळा सुधार करण्याकरिता योगदान केले.