दिनेश कुऱ्हाडे

 प्रतिनिधी

 

आळंदी : चंद्रभागा आणि इंद्रायणी या वारकरी संप्रदायासाठी गंगेइतक्याच पवित्र आहेत. वारकरी बांधवांची ही भावना लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत जातीने लक्ष घातल्याची माहिती धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले यांनी दिली. कारखान्यातील रसायनयुक्त सांडपाण्यामुळे प्रदूषित होणाऱ्या इंद्रायणी नदीचे शुद्धीकरण करुन कारखान्यांवर कारवाई व्हावी, वारकरी बांधवांच्या या मागणीची दखल घेऊन इंद्रायणीच्या पाहणीसाठी आळंदी दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी ही माहिती दिली.  

 

धर्मवीर अध्यात्मिक सेना सदैव वारकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत असून इंद्रायणीचे पावित्र्य संप्रदायाच्या अस्मितेचा भाग आहे. याबाबत मुख्यमंत्री महोदय संवेदनशील आहेतच. शासन आपल्यापरीने योग्य ती कारवाई करेल मात्र लोकांनी देखील इंद्रायणीच्या संवर्धनासाठी सहभाग घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणालेत. महाएनजीओ फेडरेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग अशा विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नदीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याशी देखील याबाबत अक्षय महाराज भोसले यांनी संपर्क साधला आहे. लवकरच स्वच्छ सुंदर व निर्मळ इंद्रायणी आपणास पाहता येईल असा विश्वास अक्षय महाराज भोसले यांनी व्यक्त केला. 

 

 पिंपरी चिंचवडचे आयुक्त मा. श्रीशेखर सिंह यांच्याशी इंद्रायणी नदीच्या संवर्धनाबाबत बोलणे झाले असून इंद्रायणीचे पावित्र्य राखण्यासाठी आम्ही प्रयत्नरत असल्याचे सांगितले. लवकरच नदीवरील जलपर्णी काढून रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या संबंधित कारखान्यांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा शब्दही दिला.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com