संविधान सन्मान रॅलीने भद्रावती ऐतिहासिक नगरी दुमदुमली…  — बालकापासून ते मोठ्यापर्यंत अनेक शाळा महाविद्यालयांचा सहभाग…  — आमदार प्रतिभा धानोरकर यांनी संविधान सन्मान रॅलीला दाखवली हिरवी झेंडी… — प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख वक्ते तुषार उमाळे व मार्गदर्शकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग…

    उमेश कांबळे

तालुका प्रतिनिधी भद्रावती

          संविधान नागरिक संवर्धन समिती भद्रावती द्वारा संविधान सन्मान दिनानिमित्त काढण्यात आलेल्या संविधान सन्मान रॅलीने अवघे भद्रावती ऐतिहासिक नगरी दुमदुमली प्रथमता भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संविधान नागरिक संवर्धन समिती द्वारा पुष्पहार अर्पण करून बालकांच्या हाती राष्ट्रध्वज असलेल्या संविधान सन्मान भव्य रॅलीला आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी हिरवी दाखवून संविधान सन्मान रॅलीला सुरुवात केली.

            प्रसंगी तहसीलदार अनिकेत सोनवणे ,ठाणेदार बिपिन इंगळे, सामाजिक कार्यकर्ते कुशल मेश्राम, जनमंच सदस्य रवींद्र तिराणिक, अजय पाटील, सुरज गावंडे, मुख्य संयोजक राजरतन पेटकर प्रामुख्याने उपस्थित होते.नाग मंदिर रोड येथून सुरुवात झालेल्या रॅलीमध्ये शाळा महाविद्यालयीन बालकांपासून तर मोठ्यापर्यंत हजारो स्त्री-पुरुष व युवकांचा सहभाग होता.

            संविधान प्रबोधन देखावे, लेझीम पथक, बँड पथक, आदिवासी सांस्कृतिक पारंपारिक नृत्य समूह, पथनाट्य, संविधान रथ यासह नाविन्यपूर्ण वेशभूषेसह अनेक शाळा महाविद्यालय विद्यार्थी, विविध स्तरावरील कार्यालयात सामाजिक सेवा संस्था व त्यांचे प्रतिनिधी आदींचा संविधान सन्मान रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभाग होता. प्रसंगी रॅलीत सहभागी असणाऱ्या शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांना विविध स्तरावर सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून बिस्किट व फळे वाटप करण्यात आले. विविध संविधान देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

           रॅली दरम्यान शहरातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. विविध जाती, धर्मातील आणि समुदायातील लोकांची उपस्थिती असल्याने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन संविधान सन्मान रॅलीतून घडले. रॅलीची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मालाअर्पण करून अभिवादन करीत संविधानाचा सन्मान व संविधानाबाबत निष्ठा राखण्याची शपथ घेण्यात आली. दुपारच्या सत्रात डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौक जुना बस स्थानक येथील विचार मंचावर संविधान दिनानिमित्त “माणुसकीची सुरक्षा कवच आणि भारतीय संविधान”,“भारतीय संविधान आणि भारतीय नागरिकांची जबाबदारी”, “भारताचे संविधान धर्मनिरपेक्षतेचा उचिताअर्थ”,”भारतीय संविधान व आजची राजकीय परिस्थिती” या विषयावर जिल्हास्तरीय विविध वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला.

            यामध्ये गट मधून (अ )मधून काव्या कवाडे प्रथम, गौरवी भिसे द्वितीय, प्रकाश उंमरे तृतीय, गट (ब) किरण वाकुडकर/ प्रलय मशाखेत्री प्रथम द्वितीय संविधान अवताडे, तृतीय प्रेम जरपोटवर, प्राविण्य प्रोत्साहन पर नैतिक कोंगरे, इत्यादी वक्तृत्व स्पर्धेतील स्पर्धकांचा बक्षीस वितरण प्रसंगी उपस्थित मान्यवर पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. सायंकाळ ला भव्य संविधान प्रधान सभेचे आयोजन करण्यात आले होते.

              सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाटील कोचिंग अकॅडमी चे संचालक अजय पाटील, स्वागताध्यक्ष राजरतन पेटकर, संविधान प्रबोधन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक तुषार उमाळे, अनिकेत दुर्गे, प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र कार्यकारी सदस्य कुशल मेश्राम, जनमंच सदस्य तथा अ. भा. ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिरानिक, भीम आर्मी महाराष्ट्र महासचिव शंकर मून, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र रायपुरे, सुरज गावंडे, इंजि.प्रकाश पिंपळकर, विशाल बोरकर, डॉ.अमित नगराळे, संदीप ढेंगळे, सुशील देवगडे मा. नगरसेवक, सुनील मेश्राम, ,रत्नाकर साठे, शाहिस्ता खान पठाण , मिलिंद वाघमारे, बिपिन देवगडे, मिलिंद शेंडे, नितेश बानोत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

           पाहुण्यांच्या उपस्थितीत वक्तृत्व स्पर्धेतील व विविध क्षेत्रातील गुणवत्ता प्राप्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले प्रसंगी विविध सामाजिक क्षेत्रातील युवा, महिला, पुरुष मंडळीं व एनजीओ सत्कार करण्यात आला.

              सुरुवातीला संविधान सन्मान दिनाच्या प्रबोधन पर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राची वेलेकर यांनी केले संचालन भाग्यश्री शेंडे व सोनू चौधरी ,आभार प्रदर्शन मनोज पेटकर यांनी केले.

          कार्यक्रम यशस्वी करण्याकरता संविधान नागरिक संवर्धन समितीतर्फे राजरतन पेटकर, अनिकेत रायपुरे, प्रणय कांबळे, बादल बाराहाते, थॉमस दुधे, संकेत चिमूरकर, सोनू सिंग, पनवेल शेंडे, सुमित हस्तक, कूलिन शेंडे, फैयाज शेख, सोनू बानागिरी, सिद्धार्थ पेटकर, वैभव पाटील, मारुती जांभुळे, कल्पना देवगडे, सुनिता खंडाळकर, विभा बेहरे, सोनू चौधरी, रेणुका साने, मानसी देव, भाग्यश्री शेंडे, विश्रांती उराडे, शब्बू रामटेके, प्राची वेलेकर, प्रीती रायपुरे, वैशाली पाटील, शिल्पा नगराळे, मालती पाटील, किरण कवाडे, झरणा सरकार, आदी संयोजन कमिटीचे कार्यकारी प्रतिनिधींनी अथक परिश्रम घेतले.