युवराज डोंगरे
खल्लार/प्रतिनिधी
खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील कसबेगव्हान येथील 30 वर्षीय विवाहितेस आत्महत्येची धमकी देऊन तिच्याशी वारंवार बळजबरी केल्याची घटना घडली असून याप्रकरणी खल्लार पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
आरोपी गोपाल अरुण बाहे वय 37 वर्ष याने गावातील एका 30 वर्षीय विवाहितेस आत्महत्येची धमकी देऊन गाडीवर बसवून पळवून नेऊन जिवे मारण्याची धमकी देत विवाहितेशी बळजबरीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
याबाबत तक्रार फिर्यादी महिलेने काल दि 26 जानेवारीला खल्लार पोलिस स्टेशनला दाखल केली असून फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरुन खल्लार पोलिसांनी आरोपी गोपाल बाहे विरुध्द कलम 366,376(2)एन,323,504 नुसार गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली असुन या घटनेचा तपास ठाणेदार चंद्रकला मेसरे करीत आहेत.