सतिश कडार्ला
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील झिंगानुर येथील मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई झाली आहे की झिंगानूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावेच्या नावे झिंगानूर चेक नंबर २, झिंगानूर चेक नंबर 1, झिंगानूर माल, व पुल्लीगुडम. या गावाना मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातुन सुरु होते व पाण्याचा पतळी खोलात घेल्याणे हातपंप मधेही पाणी येत नाही. आणि विहिरी कोरड्या पाडली आहे, तर गावांचा जवळपास असलेले नाल्यावर जाऊन पाहाणी करून लहान लहान कड्या खोदुन पाणी गाडूळ आनुन पितात या पाण्यामुळे जीवाला आरोग्याची धोका निर्माण होण्यास नाकारता येत नाही. म्हणून शासनाने व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्षघालून झिंगानूर येथील नळयोजना मंजुरी करून देण्यात आली आहे. परंतु झिंगानूर गावातील होत असते म्हणून नळयोजना मंजुरी झाली आहे पाण्याची टाकी बांधकाम झाली आहे. गावातील पाईपलाईन पण करण्यात आली आहे, परंतु पाणी पुरवठा मत्रा सुरु करण्यात आली नाही, बांधकाम होऊनही 2, लोटून जात आहे. परंतु आजुनीही सुरु करण्यात आली नाही, आदिवासी भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी करीत आहे.
झिंगानूर मला. झिंगानूर चेक. नं. 1, झिंगानूर चेक नं, 2, व पुल्लीगुडम, या चार गावात मोठी समस्या निर्माण झाली आहे, पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. या आदिवासी भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी सोय झाली नाही, 11. वी. 12, वी शिक्षणाची सोय नाही महाविद्यालय नाही, बँकेच्या सोय उपलब्ध नाही, मोबाईल फोन सोय झाली नाही, सन 2015, BSNL टावर उभरण्यात आली परंतु फोन येने जाने होत नाही शोभेची वस्तू बनली BSNL टावर, रस्ते आजुनीही कच्च्या आहेत. नाल्यावर पुलांची बांधकाम करण्यात आली नाही. विकास कधी होणार आदिवासी क्षेत्रातील दळणवळण सोय नाही.
शेतकऱ्यांना शेतातील सिंचन विहिरी साठी अर्ज केला मंजुरी होत नाही. श्रीमंत शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात येते आणि गोरगरीब शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मंजुरी नाकारले जातात सोय होणार नाही, झिंगानूर परिसरातील 90 % आदिवासी समाज आहेत परंतु शासन विकासाकडे कोणाचीच लक्ष येत नाही, स्वतंत्र होऊनही 75, ते. 76, वर्षे झाली आहे. विकास मत्रा आजुनीही झाली नाही, अशी आदिवासी भागातील लोकांची सवाल समोर आली आहे.