ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :- देशातील सर्वोच्च संस्था म्हणजेच राज्यसभेच्या अधिवेशामध्ये भाषण करतांना केंद्रिय गृहमंत्री अमित शहा हयांनी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब भिमराव आंबेडकर हयांच्याविषयी चुकीचे अपमानकारक व्यक्तव्य करून बाबासाहेबांचा संसदेत अपमान केला.
भारताची संसद ही भारतीय संविधानानुसारच चालते व भारतीय संविधानाचे निर्मात्याचेच भारतातील सर्वोच्च अशा संसदेत केंद्रीय मंत्रीपदावर असणाऱ्या व्यक्तीने अपमानजनक वक्तव्य करणे हे निंदनिय आहे. हयावरून केंद्रिय गृहमंत्री अमीत शहा हयांनी मनुवादी मानसिकता स्पष्ट दिसून येते. त्यामुळे अशा संविधान विरोधी व्यक्तीला देशाच्या गृहमंत्री पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही.
अमीत शहा हयांनी स्वतः देशाची माफी मागून राजीनामा घ्यावा, परभणी (महाराष्ट्र) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयाच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली होती. त्याचे विरोधात आंबेडकरी जनतेने रस्त्यावर उतरून निदर्शने केली त्या आंदोलकांवर पोलिसांनी दडपशाही करून लाठीचार्ज केला, त्या परभणी पोलिसांच्या हिंसाचारात सोमनाथ सुर्यवंशी हयाचा मृत्यू झाला.
हया मृत्यूची न्यायिक चौकशी करून त्याच्या कुटूंबियांना रू. १,००,००,०००/- एक कोटी रूपयाची नुकसान भरपाई देण्यात यावी व आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा देण्यात यावी.
वरिल मागण्यांचा गांभिर्याने विचार करून त्या पुर्ण कराव्यात. करिता विविध संघटनांचे माध्यमाने निवेदन देण्यात आले.