ऋषी सहारे
संपादक
जोगीसाखरा – एक राज्य नव्हे तर संपूर्ण भारत भूमी मुळ निवासी आदीम जमात असलेल्या आदीवासींची आहे.त्यांच्यावर कब्जा करु पाहणाऱ्या इंग्रजांविरुद्ध बिरसामुंडानी आमच्या हक्क अधिकारासाठी जल, जमीन, जंगलसाठी लढा दिला.
त्यामुळे तोच खरा आमचा भगवान असे प्रतिपादन खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांनी केले.ते येथील क्रांतीविर बिरसामुंडा जयंती उत्सव निमित्त आदिवासी समाज समिती जोगीसाखरा च्या वतीने आयोजित गोंडी धर्म सम्मेलन व गोंडी समुह नृत्य स्पर्धेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी उद्घाटक म्हणुन नवनिर्वाचित आमदार रामदास मसराम हे होते तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ ब्राह्मणवाडे, शिवसेना नेते हरीश मने,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, जावेद शेख वनपरिक्षेत्र अधिकारी भुषनसिह खंडाते, वैद्यकीय अधीक्षक डॉ राजकुमार कोरेटी, सरपंच संदिप ठाकुर , अभियंता कालीदास ढवळे, डॉ निलकंठ मसराम, प्रा युवराज सय्याम, डॉ संजय ठेंगरी, पंचायत समिती माजी सदस्या वृंदाताई गजभिये, केद्र प्रमुख कैलास टेभुणे, डेपो अधिकारी वालोदे, भारत कुमरे, रविशंकर ढोरे, शेषराव कुमरे, आदिवासी समाज संघटक शरद मडावी, विजय सहारे, यादोरावजी कुमरे एस आर पि, मुख्या आनंदकुमार हेमके, किरण घोडाम ,शामराव पेदाम ,भिमराव मेत्राम, खुमा गरफडे, युवराज सपाटे , यादोराव कहालकर , पुढलिक घोडाम, कितीलाल गरफडे, देवराव पेन्दाम, कितीलाल पुराम आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानातुन दलित पिडीत शोषित मागासवर्गीयांना समता स्वातंत्र्य न्याय बंधुताचे तत्व रुजवुन सामाजिक आर्थिक व राजकिय समान संधी देऊन न्याय आणि अधिकार दिलेत त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अमित शहा सारखे आकस बुध्दीचे लोक संसदेत अपमान करतात.हाल अपेष्टा सहन करुन सर्वांना न्याय मिळवून देणाऱ्या महामानवाच्या अपमानाचा आता बदला घेण्याचे आवाहनही खासदार किरसान यांनी केले.
उदघाटणीय मार्गदर्शनात काळ जरी बदलला तरी आदिवासी संस्कृती बदलुन नये मात्र व्यसनमुक्त समाज व उच्च शिक्षित पिढी घडवणे या पुढे हा संस्कृतीचा भाग झाला पाहिजे असे प्रेरणादायी मार्गदर्शन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी केले.
यावेळी खासदार डॉ.नामदेवराव किरसान व रामदास मसराम यांचेसह मान्यवरांचा शाल श्रीफळ व गोंडी धर्म वस्त्र देवुन आणि भारतीय सैन्य दलात भरती झालेला निलेश गोपाल नारनवरे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
गोंडी नृत्य स्पर्धेचे प्रथम पारितोषिक21000/- बिरसा मुंडा डान्सगृप मानपुर कोहका छत्तिसगढ, व्दीतीय 15000/-आदिवासी डान्स राजनांदगाव तर तिसरा 10000/-कराडी येथील गृपने घेतला.
यात कायक्रामाच्या आदल्या दिवशी दि. २३ डिसेंबरला आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर घेण्यात आले, त्यात ३३ रक्त दात्यानी रक्तदान केले. दि २४ ला दुपारी दोन वाजता बिरसा मुंडा जयंती उत्सवानिमित्त आदिवासी गोंडी धर्म भव्य मिरवणुक काढण्यात आली.
त्यानंतर विवाह सोहळा संपन्न झाला त्या प्रसगी बाहेर गावासह गावातील मोठ्या संख्येने नागरीक व आदिवासी बांधव भगिनी उपस्थीत होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल कुमरे यांनी केले तर प्रास्ताविक जकास चे अध्यक्ष दिलीप घोडाम तर आभारप्रदर्शन योगेश कुमरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश कुमरे सुनिल कुमरे सचिन कुमरे, रामु मडावी, महेंद्र पेन्दाम, मंगेश कुमरे, विवेक कुमरे , विनोद ऊईके, गुलाब सयाम, रत्नाजी पेदाम, अमर कुमरे, विकी मडावी ,आकाश सयाम, बापु ऊईके, अतुल ऊईके, रामदास सयाम , लक्ष्मण सडमाके , अजय मडावी, पुषोत्तम ऊईके मयुर मडावी यांसह आदिवासी पुरुष व महिला मंडळ संपूर्ण गावातील पुरुष युवक महिला मंडळ बचतगट भोजन मंडळ यांचे सहकार्य लाभले.