उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमूर तालुक्यातील पिंपळगाव येथे दुःखद् घटना घडली असून बैलगाडीचे चाक मानेवरून गेल्याने 45 वर्षे असलेल्या इसमाचा मृत्यू झाला.
पिंपळगाव आणि वघळपेठ या दोन गावाच्या मध्यभागीतील नाल्याजवळून एक पानदान रस्ता जातो,त्याच पांदन रस्त्यावर ही घटना घडली.
मृतकाचे नाव श्री.चंदू खटू जांभुळे असे असून त्यांचे अंदाजे वय 45 आहे.ही घटना अंदाजे ३ वाजताची आहे.
संबंधित व्यक्ती ही शेतावरून धान धुलाई करत असताना बैल बंडी वरून पडला आणि बैल बंडीचे चाकात मृतक व्यक्तींची मान आल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे.