ऋग्वेद येवले
नागपूर विभागीय प्रतिनिधी
साकोली : भंडारा जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन शाखा साकोली वतीने २१ वे वार्षिक अधिवेशन ( सोम. २५.) ला पेन्शनर्स भवन, उपविभागीय कृषी कार्यालयमागे साकोलीत संपन्न झाले.
अधिवेशनात उदघाटक पं. स. सभापती गणेश आदे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे, अतिथी यशवंत गहाणे, जि.प.स. माहेश्वरी नेवारे, तुळशीराम भुरे, आर.बी. तिडके, वि.ना. गि-हेपुंजे, ए.पी. पटले, एस.के. देशमुख, आर. एम. रामटेके आदी हजर होते.
अधिवेशनात दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अमृत महोत्सवी ७५ वर्षीय सभासदांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अहवाल वाचन सचिव रामलाल डोंगरवार यांनी केले. मंचावरील अतिथी प्रकाश बाळबुध्दे यांनी पेन्शनर्स भवनाकरीता करीता जिना बांधकाम, योगासने वर्ग, फर्निचर आणि विकासनिधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले आणि सदस्यगणांचे समस्या शासनदरबारी मांडण्यात येईल असे प्रतिपादन केले.
अधिवेशनात संचालन आपल्या वैचारिक काव्य शब्दांतून कोषाध्यक्ष ए.ए. पठाण यांनी केले. पेन्शनर्स असोसिएशनचे अधिवेशनात साकोली ता. अध्यक्ष विठ्ठल गि-हेपुंजे, उपाध्यक्ष भाऊराव फुलबांधे, सचिव रामलाल डोंगरवार, कोषाध्यक्ष अताउल्लाखॉं पठाण, सहसचिव किशोर गोस्वामी, लिला टेंभरे यांनी अथक परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन प्रमिला सार्वे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.