कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी -: तालुक्यातील कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस दोन कि.मि. अंतरावर असलेले कांद्री वार्ड क्रमांक पाच मधील गजानन मंदिरा जवळील कविता शुक्ला यांचा घरातुन अज्ञात चोरट्यांनी चांदी सोन्याचे दागिने सामग्रीसह लंपास केले असल्याची घटना घडली आहे.सदर दागिन्यांची किंमत दोन लाख पंचवीस हजार रुपये असल्याचे तपासात पुढे आले आहे.
कन्हान पोलीसांनी फिर्यादी कविता शुक्ला यांचा तक्रारी वरून पो.स्टे.कन्हानला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक २१ डिसेंबरला फिर्यादी सौ.कविता राकेश शुक्ला वय ५५ वर्ष रा.गजानन मंदिर कांद्री हे आपल्या पती सोबत त्यांची लहान मुलगी दिल्ली येथिल कार्यरत कु. प्रिंसी शुक्ला ला भेटायला गेल्या होत्या.जातांना घरातील सर्व दरवाजे, खिडक्या बंद करुन मुख्य दरवाज लाकप केले होते.
दुपारी १:३० वाजता याकुब खॉन ऑटो मध्ये बसुन रेल्वे स्टेशन नागपुरला निघाले.दुपारी ४:०० वाजताच्या दरम्यान कविता शुक्ला व त्यांचे पती ट्रेन मध्ये बसुन नागपूर वरुन दिल्लीला निघाले असता प्रवास करते वेळी बुधवार दिनांक २२ डिसेंबरला सकाळी ७:५० वाजता कविता शुक्ला यांना त्यांचे घरा जवळील राहणारे मिसेज वर्मा यांनी फोन करून सांगितले कि तुमचा घराचा दरवाजा उघडा आहे.
अशा माहिती वरुन कविता राकेश शुक्ला यांनी आपल्या दिर नामे धर्मराज शुक्ला रा. साई नगर कन्हान यांना फोन करुन घराकडे जाऊण पाहणी करायला सांगितले.तसेच कविता राकेश शुक्ला यांनी आपल्या लहान मुलीला फोन मध्ये आनलाईन सीसीटीवी कैमरे चेक करायला सांगितले असता लहान मुली ने घरी चोरी झाल्याची माहिती दिली.
तसेच दिर नामे धर्मराज शुक्ला यांनी वहीनी कविता राकेश शुक्ला यांना घराच्या बेडरुम मधील समान अस्त व्यस्त पडुन आहे अशी माहिती दिली.
गुरुवार दिनांक २३ डिसेंबरला कविता राकेश शुक्ला हे आपल्या लहान मुलीला घेऊन दिल्ली वरुन नागपुरला येण्याकरिता निघाली. शनिवारी २४ डिसेंबरला कविता राकेश शुक्ला हे आपल्या लहान मुली सोबत नागपुरला पोहोचल्यात.त्यांनी आपल्या घरी जाऊन पाहणी केली असता घरातील दरवाज्याची कड़ी तुटलेल्या अवस्थेत दिसली आणि बेडरूम मध्ये लागलेला ताला तुटलेला दिसला.
आत जाऊन पाहणी केली असता बेडरूम मध्ये ठेवलेली दोन लाकड्याच्या आलमारीचा लॉक टुटलेला दिसला व आलमारी मध्ये ठेवलेले १) सोने कि.पानछाप अंगूठी ५.६९ ग्राम २) पिट्टु सोन्याचे मनी ०.५ ग्राम ३) जेन्टस् सोने कि अंगूठी ४.८१ ग्राम ४ ) सोने कि नथनी १.६६ ग्राम ५) चांदी के कंगन किंमत ३०००/- रु. आणि ६) नगदी ३००० /- रु. दिसले नाही.
याचबरोबर कविता शुक्ला यांनी पूजा घरात जाऊन पाहणी केली असता पूजा घरात ठेवलेले ७) एक जेन्टस् सोने ची चैन १०.०० ग्राम, ८) 1 सोने कि गौप १०.०० ग्राम ९)1 सोने कि गोप १०:०० ग्राम, (10) सोने कि गौप १०:०० ग्राम 11 ) 2 सोने के मंगलसूत्र १५.०० ग्राम 12) 3 जेन्टस अंगूठी १५ ग्राम13] 1 लेडीस सोने कि अंगुठी (4.81 )14)2 सोने कि कान कि बाली 2.50 ग्राम असा एकुण 89.97 ग्राम का सोना 10 ग्राम 25,000/- प्रमाने असा एकूण 2. लाख 25,000/- रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन पसार केल्याचे दिसून आले.
फिर्यादी कविता शुक्ला यांचा तक्रारी वरून कन्हान पो.स्टे. ला अज्ञात आरोपी विरुद्ध अप.क्रमांक ७५१/२२ कलम ४५४,४५७,३८० भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा ना. ग्रा.सीसीटीवी फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.