दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
पुणे : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात वारकरी आक्रमक झाले आहेत. राजकारणासाठी वारकऱ्यांचा वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यावेळी उपस्थित होते.
शरद पवार आणि वारकऱ्यांमध्ये तासभर चर्चा झाली. वारकऱ्यांची भूमिका आणि त्यांचे म्हणणे शरद पवार यांनी ऐकून घेतले. सुषमा अंधारे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत वारकरी संप्रदायाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. वारकरी संप्रदायाच्या साहित्याचा खरा प्रचार व्हावा, असा सल्लाही शरद पवार यांनी वारकऱ्यांना दिला; तसेच संयम बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर वारकऱ्यांनी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी वारकऱ्यांबरोबर सोमवारी चर्चा केली.वारकऱ्यांची भूमिका जाणून घेत पवार यांनी संमय राखण्याचे आवाहन केले.
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी त्यांच्या त्या व्हिडीओवरून दिलगिरी व्यक्त केलेली आहे. सुषमा अंधारे यांचा तो व्हिडीओ दहा वर्षांपूर्वीचा आहे. या व्हिडीओवरून वारकरी संतप्त झाले आहेत. मात्र हे सर्व वारकरी भाजप समर्थक आहेत. त्यामुळे सुषमा अंधारेही या वारकऱ्यांविरोधात आक्रमक झालेल्या दिसत आहेत.