दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : समाजासाठी झोकून देऊन काम केले तर तोच समाजबांधव अनेक संधी उपलब्ध करून देत असतो. मागील अनेक दिवसांपासून गणेश दळवी यांनी समाजात समाजासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे चांगल्या कामाची पावती म्हणून समाजाने त्यांना सावता परिषदेच्या प्रदेश महासचिवपदी नियुक्त केले. पदाच्या माध्यमातून दळवी यांनी समाजाचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवावेत असे आवाहन आमदार दिलीप मोहिते – पाटील यांनी केले.
भोसे (ता.खेड) येथे सावता परिषदेच्या प्रदेश महासचिवपदी गणेश दळवी यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या विशेष सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, प्रदेशाध्यक्ष मयूर वैद्य, विनायक घुमटकर, अमित जावळे, बाबाजी काळे, सयाजीराजे मोहिते, विलास कातोरे, तुकाराम कांडगे, दिगंबर लोणारी, विजय काळे, रोहिणी पिंगळे, अशोक खांडेभराड, प्रकाश वाडेकर, ॲड. विजयसिंह शिंदे, विजय शिंदे, मनोज खांडेभराड, अनिल साबळे, गणेश पवळे, पप्पू टोपे, विश्वास गांडेकर, चंद्रकांत गांडेकर, रंजना पठारे, लंकाबाई कुटे, मीनाक्षी लोणारी, प्रतीत ओव्हाळ, पूजा गुंडगळ, अण्णासाहेब लोणारी, गणेश कुटे, जालिंदर कुटे, रोहिदास पवळे, संपत कुटे आदिंसह मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावता परिषदेच्या माध्यमातून दळवी राज्यात उल्लेखनीय काम करत आहेत. समाजासाठी अशा होतकरू तरुणांची गरज आहे. प्रदेश महासचिव पदाच्या माध्यमातून आगामी काळात त्यांच्याकडून संघटना मजबुतीकरणासह अनेक प्रश्न सोडविले जातील असा विश्वास अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी व्यक्त केला. दरम्यान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते दळवी यांचा सत्कार करण्यात आला.